२०१५ मध्ये बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात अचानक एमएस धोनीने विराट कोहलीला क्षेत्ररक्षण करण्यास का सांगितले, याबद्दल मयंक अग्रवालसोबत ‘ओपन नेट्स विथ मयंक’ या कार्यक्रमात बोलताना विराटने खुलासा केला आहे. मयंकने जेव्हा विराटला यष्टीरक्षण करण्यामागील कारण विचारले, तेव्हा विराट म्हणाला की, या बाबतीत धोनी तुम्हाला चांगल्याप्रकारे सांगेल.
“त्या दिवशी मी पाहिलं की धोनी (MS Dhoni) सामन्यामध्ये किती सक्रिय असतो. तो मला म्हणाला की थोड्या वेळासाठी यष्टीरक्षण कर. मला ग्लोव्हज मिळाले होते. त्यावेळी धोनी गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि इतर गोष्टींवर लक्ष देऊ लागला. त्यावेळी मला समजले की धोनी जेव्हा मैदानावर असतो, तेव्हा तो किती सक्रिय असतो. त्याला प्रत्येक चेंडूवर लक्ष द्यायचे असते. मैदानात काय सुरू आहे, त्यावरही त्याला लक्ष द्यायचे असते,” असे विराट म्हणाला.
यादरम्यान विराटने (Virat Kohli) यष्टीरक्षण करताना येणाऱ्या अडचणींवरही चर्चा केली. तो म्हणाला, “त्यावेळी सामन्यात उमेश यादव (Umesh Yadav) वेगाने गोलंदाजी करत होता. मला वाटले की आता चेंडू माझ्या तोंडावर लागतोय. बाहेरून हेल्मेट मागवून ते घालावे असे मला वाटले. मग विचार केला की वेगवान गोलंदाजाविरुद्ध असे केले तर उगाच इज्जत जाईल, म्हणून मी तसंच खेळलो.”
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी स्वत:च्या निवडीमागील कारण मयंकने (Mayank Agarwal) विराटला विचारले. त्यावर विराटने म्हटले की तू तुझ्या कार्यक्रमात बोलावून स्वत:ची प्रशंसा करवून घेत आहेस. विराट पुढे म्हणाला, “ऑस्ट्रेलियाच्या महत्त्वपूर्ण दौऱ्यासाठी निर्भीडपणे खेळणारा फलंदाज आम्हाला पाहिजे होता. मी तुला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तसेच आयपीएलमध्ये पाहिले होते. मला वाटले की तू त्या खेळपट्ट्यांवर चांगल्याप्रकारे खेळू शकतो. त्यामुळे तुला संघात स्थान मिळाले.”
महत्त्वाच्या बातम्या-
-एलिसा पेरीच्या घटस्फोटनंतर का ट्रोल होतोय ‘हा’ भारतीय खेळाडू, घ्या जाणून
-हसीन जहानला येतेय ‘पिया की याद’; परंतु चाहते म्हणतात, शमी तर…
-पंड्याची पत्नी नताशाने शेअर केला फोटो; चाहते म्हणतात, भाभी…
ट्रेंडिंग लेख-
-एमएस धोनीमुळे भारतीय संघाला मिळाले हे ५ ‘मॅच विनर’….
-भारताचे ३ दिग्गज खेळाडू ज्यांना कधीच मिळाला नाही अपेक्षित सन्मान…