---Advertisement---

क्रिकेटच्या लोकप्रिय होस्टसोबत दिसणार टीम इंडियाचा ‘हा’ माजी खेळाडू…

On: गुरूवार, सप्टेंबर 17, 2020 4:55 PM
---Advertisement---

जगभरातील लोकप्रिय आणि सर्वात मोठी टी२० लीग आयपीएलची प्रतीक्षा संपली आहे. आयपीएलचा १३ वा हंगाम आला आहे. आणि प्रत्येकजण आपल्या आवडत्या खेळाडू आणि संघांना पडद्यावर पाहण्याची तयारी करत आहे. अशातच, माजी भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग आणि क्रिकेटशोचा लोकप्रिय होस्ट समीर कोचर १८ सप्टेंबरपासून फ्लिपकार्ट ऍपवर ‘पॉवर प्ले विथ चॅम्पियन्स’ नावाचा इंटरएक्टिव क्रिकेट शो सादर करणार आहेत.

अ‍ॅक्शनने भरलेल्या या शोमध्ये सेहवागचे कौशल्य आणि समीरच्या स्पॉट रिस्पॉन्सचे संयोजन दिसेल. या शोमध्ये ते भारताच्या आवडत्या क्रिकेट मालिकेविषयी चर्चा करतील. त्याचबरोबर प्रेक्षकांना आपल्या क्रिकेटच्या ज्ञानाचा वापर करून सामन्याच्या वेगवेगळ्या पैलूंबद्दल भविष्यवाणी करत अनेक पुरस्कार जिंकण्याची संधी मिळणार आहे. नव्या स्वरूपातील कार्यक्रमाचे होस्ट म्हणून ही जोडी चेष्टा-मस्करी बरोबरच क्रिकेटशी संबंधित रोमांचक माहिती सांगेल.

शो आणि आगामी सामन्यांबाबत सेहवाग म्हणाला, “हे वर्ष आपल्या सर्वांसाठी आणि खेळासाठी मागील सर्व वर्षांपेक्षा वेगळे आहे. या कठीण काळात आम्हाला एकत्र ठेवण्यात तंत्रज्ञानाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. फ्लिपकार्ट व्हिडिओने तंत्रज्ञानासह भारतीयांच्या क्रिकेटविषयीची आवड असणाऱ्यांना एकत्रित केले आहे आणि पॉवर प्ले विथ चॅम्पियन्ससारख्या मनोरंजक ऑफर आणल्या आहेत. गोंगाट करणाऱ्या गर्दीत मैदानावर असण्याचा थरार मी मिस करतोय, परंतू या प्रकारच्या शोमुळे मला प्रेक्षकांशी संपर्क साधण्याची संधी मिळते.“

“हे एक सामुदायिक भावना निर्माण करते, ज्याची या कठीण काळात खूप गरज आहे. समीरबरोबर पडद्यावर येण्यास मी खूप उत्सुक आहे आणि येत्या क्रिकेटचा हंगाम खूप चांगला असेल, अशी मला आशा आहे. मी सर्व संघांना शुभेच्छा देतो,“ असेही तो पुढे बोलताना म्हणाला.

याव्यतिरिक्त समीर कोचर म्हणाला, “मी बर्‍याच काळापासून क्रिकेटशी संबंधित आहे आणि इतर कोणत्याही चाहत्यांप्रमाणेच मलाही या खेळाचा आनंद आहे. फ्लिपकार्ट व्हिडिओच्या या संवादात्मक कार्यक्रमाचे होस्ट करण्यास मी खूप उत्सुक आहे. मला असे म्हणायचे आहे की वीरू पाजींबरोबर बोलणे मला आवडते. आम्ही सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहोत की स्पर्धा कधी सुरू होईल, तर खेळाचा आनंद घेत, लोकांना बक्षिसे जिंकण्याची संधी देण्यापेक्षा चांगले काय असू शकते. परंतू मला मैदानावरची कमतरता जाणवेल, पण मला आनंद आहे की मी अजूनही लोकांचे मनोरंजन करू शकतो.”

पॉवर प्ले विथ चॅम्पियन्स वापरकर्त्यांना दररोज क्विझमध्ये भाग घेण्याची संधी देईल. सेहवाग आणि समीर या तज्ज्ञांच्या भविष्यवाणीवर आधारित सहा प्रश्न खेळाच्या भविष्यवाणीशी संबंधित वापरकर्त्यांच्या ज्ञान आणि कौशल्याला आव्हान करतील. संघ, खेळाडू, किती धावा काढल्या जातील आणि किती विकेट घेतल्या जातील यासारख्या खेळाच्या विविध प्रश्नांवर वापरकर्त्यांची चाचणी घेतली जाईल. सहा पैकी तीन प्रश्नांची उत्तरे देणारे दर्शक सामन्यानंतर विजेते घोषित केले जातील आणि त्यांना उत्तेजक बक्षिस दिले जाईल.

महत्त्वाच्या बातम्या-

-माजी दिग्गज म्हणतो, ‘संघांना मांकडिंगपासून रोखायचे असेल, तर ‘हे’ काम करा’

-एकमेव खेळाडू ज्याने तब्बल ६ वेळा केला आयपीएलच्या अंतिम सामन्यात पराभवाचा सामना

-धोनीचा सीएसके संघाला मोठा झटका; हा खेळाडू पहिल्या सामन्याला मुकण्याची शक्यता

ट्रेंडिंग लेख-

-वनडेमध्ये जलद १०० षटकार मारणारे ८ खेळाडू; या भारतीय दिग्गजाचाही आहे समावेश

-आयपीएल २०२० मध्ये कोलकाता नाईट रायडर्ससाठी हे ३ खेळाडू ठरणार विजयाचे शिल्पकार?

-चेन्नई सुपर किंग्सला चौथ्यांदा आयपीएल चषक मिळवून देऊ शकतात हे ३ महारथी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---