बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेतून पदार्पण करणाऱ्या शुबमन गिलने भारतीय संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली होती. तो भारतीय संघाला उत्कृष्ट सुरुवात करून देत होता. परंतु सध्या मायदेशात सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याची दुसऱ्या सामन्यातील खेळी वगळता, त्याला एकही मोठी खेळी करता आली नाही .त्यामुळे माजी भारतीय फलंदाजाने त्याच्या फलंदाजीमध्ये होत असलेल्या चुका निदर्शनात आणून दिल्या आहेत.
चेन्नईमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील अर्धशतक वगळता, त्याला आतापर्यंत एकही अर्धशतक झळकावता आले नाही. चौथ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावातदेखील तो ० धावांवर बाद झाला आहे. अशातच माजी भारतीय फलंदाज वीवीएस लक्ष्मणने गिल फलंदाजीमध्ये सतत का अपयशी ठरत आहे? याचे कारण सांगितले आहे.
हे आहे कारण
लक्ष्मणने गिलच्या फलंदाजीबद्दल म्हटले, “गिलला आपल्या फलंदाजीमध्ये सुधारणा करायची आवश्यकता आहे. मुख्यतः चेंडू जेव्हा आतमध्ये येतो; तेव्हा त्या चेंडूला कसं खेळावं हे त्याला शिकायची गरज आहे. तसेच गिलच्या फलंदाजीमध्ये तांत्रिक चुकादेखील दिसून येत आहेत. तुम्ही पाहू शकता की, तो फलंदाजी करत असताना त्याचे डोके खालच्या बाजूला जात आहे आणि पाय देखील सरळ जात नाही. त्याला या गोष्टींमध्ये सुधारणा करावी लागेल.”
इंग्लंडविरुद्ध गिलचा फ्लॉप शो
इंग्लंड विरुद्ध खेळलेल्या मालिकेत गिलने ७ डावात २९, ५०, ०, १४, ११, १५, ० धावा केल्या आहेत. यावर लक्ष्मण म्हणाले,” शुबमन गिल डावाची सुरुवात चांगली करत आहे. परंतु त्याला जास्त धावा करण्यात अपयश येत आहे. त्यामुळेच तो दबावात येऊ शकतो. त्याला हे विसरून चालणार नाही की, केएल राहुल आणि मयंक अगरवालसारखे सलामीवीर फलंदाज संधी मिळण्याच्या प्रतिक्षेत आहेत. ”
भारतीय गोलंदाजाची उल्लेखनीय कामगिरी
या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडला पहिल्या डावात ७५.५ षटकात सर्वबाद २०५ धावाच करता आल्या आहेत. इंग्लंडकडून या डावात बेन स्टोक्सने सर्वाधिक ५५ धावा केल्या. तसेच डॅनियल लॉरेन्सने ४६ धावांची खेळी केली. अन्य कोणत्याही फलंदाजाला ३० धावांचा टप्पा पार करता आला नाही. भारताकडून अक्षर पटेलने सर्वाधिक ४ गडी बाद केले. तर आर अश्विनने ३ गडी, मोहम्मद सिराजने २ आणि वॉशिंग्टन सुंदरला १ गडी बाद करण्यात यश आले.
महत्त्वाच्या बातम्या-
“ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिकेत कोणीही खेळेल, भारताच्या क्रिजवर धावा करणाराचं दर्जेदार फलंदाज”
वाटलं नव्हत सिराज अशी गोलंदाजी करेल, रुटला चांगलं फसवलं; इंग्लिश दिग्गजाने उधळली स्तुतिसुमने
PSL 2021: नाश्ता म्हणून सडलेले अंडे आणि पाव दिले जातात; इंग्लिश खेळाडूकडून पोलखोल






