---Advertisement---

हार्दिक बाद होता की नाही? पत्नी नताशा पंच्यांच्या निर्णयावर नाराज

Hardik Pandya
---Advertisement---

शुबमन गिल वनडे क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात द्विशतक करणारा फलंदाज ठरला. गिलने बुधवारी (18 जानेवारी) न्यूझीलंड संघाविरुद्ध खेळल्या गेलेल्या वनडे सामन्यात 208 धावांची वादळी खेळी केली. फलंदाज आणि गोलंदाजांच्या या उत्कृष्ट प्रदर्शनच्या जोररावर भारताने हा सामना 12 धावांनी जिंकला. सामन्यात हार्दिक पंड्या मोठी खेळी करू शकत होता, मात्र सामना सुरू असताना एक असा प्रकार घडला, ज्यामुळे हार्दिकला विकेट गमवावी लागली. सोशल मीडियावर पंचांच्या निर्णयवर नाराजी व्यक्त केली जात आहे.

शुमबन गिल (Shubman Gill) याने न्यूझीलंडविरुद्धच्या या पहिल्या वनडे सामन्यात 149 चेंडूत 208 धावा केल्या. यात 19 चौकार आणि 9 षटकारांचा समावेश होता. 23 वर्ष आणि 132 दिवसांच्या गिलने ही खेळी केल्यामुळे भारतीय संघ 50 षटकात 8 बाद 349 धावांपर्यंत मजल मारू शकला. शुबमन गिल भारतासाठी वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा पाचवा फलंदाज बनला आहे. एकीकडे गिलचे या अप्रतिम खेळीसाठी कौतुक होत असताना दुसरीकडे हार्दिक पंड्या (Hardik Pandya) अनोख्या पद्धतीने बाद झाल्यामुळे चाहते प्रश्न विचारत आहेत.

https://twitter.com/YAC_JK/status/1615671634962313216?s=20&t=DxpErPTeSl2OCugPGgAwoQ

न्यूझीलंडचा अष्टपैलू डॅरिल मिचेल 40 व्या षटकात गोलंदाजी करत होता. हार्दिक या षटकात 28 धावा करून फलंदाजी करत होता. षटकातील दुसऱ्या चेंडूवर मिचेलने ऑफ स्टंपवर गुड लेंथ टाकला. हार्दिक हा चेंडू हलक्या हाताने लेग साईडला मारण्याच्या प्रयत्नात होता, पण चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ शकला नाही. यष्टीरक्षक टॉम लॅथमने चेंडू पकडण्यासाठी हात पुढे घेतले, पण त्यावेळी त्याच्या हातातील ग्लव्स स्टंपवरील बेल्सला लागले आणि बेल्स खाली पडल्या.

https://twitter.com/vinay_cricket/status/1615675689390473216?s=20&t=wtIebH22otpDPlimmS0KCQ

पहिल्यांदा पाहिल्यानंतर असेच वाटले की, चेंडू स्टंप्सला लागला आहे. पण रिप्लेमध्ये पाहिल्यानंतर समजले की, हार्दिक बाद नव्हता. स्टंप्सच्या बेल्स चेंडूने नाही, तर यष्टीरक्षकाच्या ग्लव्समुळे पडल्या होत्या. पंचांनी हा रिप्ले पाहिला पण तरी हार्दिकला बाद दिले गेले. याच पार्श्वभूमीवर चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी पाहायला मिळत आहे. हार्दिकची पत्नी नताशा स्टॅनकोविक (Natasha Stankovic) हिने देखील स्वतःच्या अधिकृत सोसल मीडिया खात्यावरून पंचांच्या या निर्णयाविषयी नाराजी व्यक्त केली. (Was Hardik out or not? Wife Natasha is upset with the umpires’ decision)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतीय क्रीडाक्षेत्राला मोठा धक्का! स्टार खेळाडू डोपिंग चाचणीत पाॅझिटिव्ह
द्विशतक होताच सचिनकडून साराचा शुबमनसोबत साखरपुडा फिक्स? ट्विट होतंय व्हायरल

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---