---Advertisement---

‘आम्हाला **** फरक पडत नाही’, भारतीय दिग्गजाने घेतला पाकिस्तानी पत्रकाराचा समाचार

On: शनिवार, नोव्हेंबर 28, 2020 10:16 AM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी (27 नोव्हेंबर) सिडनी क्रिकेट स्टेडियममध्ये झाला. खराब कामगिरीमुळे भारतीय संघाचा या सामन्यात दारुण पराभव झाला. या पराभवामुळे भारतीय संघावर चौफेर टीका होत आहे. यातच पाकिस्तानच्या एका पत्रकाराने भारतीय संघाबद्दल टिप्पणी केली आहे. त्यावर भारताच्या माजी दिग्गज फलंदाजाने त्याला भन्नाट उत्तरही दिले आहे.

भारतीय संघाची षटकांची गती होती संथ
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाची षटकांची गती (ओव्हर रेट) अतिशय संथ होती. गोलंदाजांना 50 षटके फेकायला तब्बल 4 तास लागले.

पाकिस्तानच्या पत्रकाराचा भारतीय संघावर निशाणा

पाकिस्तानी पत्रकार मझहर अर्शद याने भारतीय संघाच्या षटकांच्या गतीबद्दल भाष्य करताना ट्विट केले की, “भारतीय संघाला 50 षटके फेकायला 4 तास लागले. विश्वचषक सुपर लीगमध्ये या संघाला 1 गुण कमी देण्यात येईल.”

वासिम जाफरने दिले भन्नाट उत्तर

पाकिस्तानच्या पत्रकाराला भारताचा माजी दिग्गज फलंदाज वासिम जाफरने मीमच्या माध्यमातून भन्नाट उत्तर दिले. यासोबतच त्याने लिहिले की, “आयोजक देश म्हणून भारतीय संघ 2023 विश्वचषक स्पर्धेसाठी आधीच पात्र ठरला आहे.”

सन 2023 मध्ये वनडे विश्वचषक स्पर्धा भारतात होणार आहे. त्यामुळे आयोजक देश म्हणून भारतीय संघ या स्पर्धेत थेट पात्र ठरला आहे.

भारतीय संघाचा तीनही प्रकारच्या क्रिकेट मालिकेत होईल पराभववॉ

भारतीय संघाने या सामन्यात केलेल्या खराब कामगिरीमुळे इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉ यानेही टीका केली आहे. त्याचा असा विश्वास आहे की ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघाचा तीनही प्रकारच्या क्रिकेट मालिकेत पराभव होईल.

दुसरा वनडे होईल 29 नोव्हेंबरला

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा वनडे सामना रविवारी (29 नोव्हेंबर) खेळला जाईल. या सामन्यात भारतीय संघ कशी कामगिरी करतो हे पाहावं लागेल.

वनडे मालिकेनंतर होईल टी20 आणि कसोटी मालिका

वनडे मालिकेनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध 3 सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे आणि त्यानंतर 17 डिसेंबरपासून 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होईल.

महत्त्वाच्या बातम्या –

Video – भारताविरुद्धच्या पहिल्या वनडेदरम्यान डेविड वॉर्नरचे साऊथ इंडियन गाण्यावर थिरकले पाय

भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिन्ही क्रिकेट मालिकेत होईल पराभव, माजी कर्णधाराची भविष्यवाणी

‘असा’ कारनामा करणारा फर्ग्यूसन न्यूझीलंडचा केवळ दुसराच गोलंदाज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---