भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात पराभूत झाल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाने मालिका गमावली आहे. पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला ६६ धावांनी, तर दुसर्या सामन्यात ५१ धावांनी पराभूत केले. या दोन्ही सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा नायक ठरलेल्या स्टीव स्मिथला माजी भारतीय सलामीवीर वसीम जाफरने सहलीला जाण्याची खास ऑफर दिली आहे.
स्मिथ ठरला दोन्ही विजयांचा नायक
स्टीव स्मिथच्या फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने वनडे मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. वनडे मालिकेनंतर दोन संघांदरम्यान तीन सामन्यांची टी२० आणि त्यानंतर चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल. जर स्मिथचा हा फॉर्म कायम राहिला तर भारतीय संघासमोरील अडचणी वाढू शकतात. अशा परिस्थितीत, माजी भारतीय सलामीवीर आणि किंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाजी प्रशिक्षक वसीम जाफर याने चार कसोटी सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या या माजी कर्णधाराला एक मजेदार ऑफर दिली आहे.
ट्विटरवरून दिली खास ऑफर
जाफरने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून स्मिथला ही ऑफर दिली. आपल्या ट्विटमध्ये त्याने एक फोटो लावला आहे. यासोबत त्याने लिहिले आहे की, ‘अभिनंदन! दोन जण हवाई येथे सहलीसाठी जाऊ शकतात. तुम्हाला कसलाही खर्च करावा लागणार नाही. पंधरा तारखेला तुमचे प्रयाण होईल. एका महिन्याच्या सहलीचा आनंद घ्या.’
अशाप्रकारच्या मजेशीर फोटोत जाफरने स्टीव स्मिथला टॅग करत लिहिले की, ‘अभिनंदन स्टीव स्मिथ, ही संधी सोडू नकोस.’
Congratulations @stevesmith49!! Don't let this one go! 😄 pic.twitter.com/m3ryHbMwA0
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) November 30, 2020
सध्या सोशल मीडियावर व्यस्त आहे जाफर
पूर्वी सोशल मीडियावर तितकासा व्यस्त नसणारा जाफर सध्या वारंवार ट्विटरवरून मजेशीर ट्विट करत असतो. आयपीएलवेळी त्याने एक वादग्रस्त मीम शेअर केला होता. त्यानंतरही तो वारंवार वेगवेगळे गमतीदार मीम शेअर करताना दिसला आहे. दुसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलने केलेल्या तुफानी खेळीनंतर, त्याने बॉलिवूड चित्रपट ‘सरफरोश’ मधील एक वाक्य मीम स्वरूपात शेअर केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
‘…म्हणून भारताकडे कामचलाऊ गोलंदाजांची कमतरता’, माजी यष्टीरक्षक फलंदाजाने सांगितली समस्या
पती असावा तर असा! विराटने पत्नी अनुष्काला शिकवले ‘शीर्षासन’
धक्कादायक! पाकिस्तानचा सातवा खेळाडू ‘कोरोना पॉझिटिव्ह’, दौरा रद्द होण्याचे संकट
ट्रेंडिंग लेख-
नादच खुळा! ऑस्ट्रेलिया दौर्यात एकाच टी२० मालिकेत सर्वात जास्त विकेट्स घेणारे ३ भारतीय शिलेदार
भारताविरुद्ध वनडेत सलग ३ शतके झळकविणारे फलंदाज, पाकिस्तानच्या २ खेळाडूंचाही समावेश
भारतीय गोलंदाजांना रडकुंडीला आणत सर्वाधिक शतके ठोकणारे ३ धडाकेबाज फलंदाज