---Advertisement---

शार्दुल ठाकूर लॉर्ड्स कसोटीतून बाहेर होताच वसीम जाफरने केलेलं ‘भन्नाट’ ट्विट होतंय तुफान व्हायरल

On: गुरूवार, ऑगस्ट 12, 2021 12:47 AM
---Advertisement---

गुरुवारी (१२ ऑगस्ट ) भारत विरुद्ध इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला विजयाची सुवर्णसंधी होती. परंतु पावसाने अडथळा निर्माण केल्यामुळे हा सामना अनिर्णीत राहिला होता. तसेच दुसरा कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.संघातील वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर हा दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर झाला आहे. ही बातमी मिळाल्यानंतर माजी भारतीय क्रिकेटपटू वसीम जाफर यांनी एक ट्विट केले आहे.जे सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू वसीम जाफर हे सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव्ह असतात. ते आपल्या मजेशीर आणि व्यंगात्मक ट्विटमुळे नेहमीच चर्चेत असतात. नुकताच शार्दुल ठाकूर दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर झाल्याची माहिती मिळताच त्यांनी एक मजेशीर ट्विट केले आहे.त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, “जर शार्दुल ठाकूर लॉर्ड्स कसोटीतून बाहेर झाला तर हे खूप दुःखद असेल. शेवटी क्रिकेटपटूंना अनेकदा त्यांच्या नावावर असलेल्या स्टेडियममध्ये खेळण्याची संधी मिळत नाही.”

शार्दुल ठाकूरने इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ४ गडी बाद केले होते. त्याने जो रूटला बाद करून माघारी धाडले होते. मुंबईच्या शार्दुल ठाकूरला, ‘ठाकूर’ म्हणून देखील ओळखले जाते. काही भारतीय भाषेत ठाकूरचा अर्थ ‘देव’ असा होतो. सोशल मीडियावर त्याला ‘लॉर्ड शार्दुल ठाकूर’ म्हणून ओळखले जाते. त्याचमुळे जाफरने असे ट्विट करत मजा घेतली आहे.(Wasim jaffer tweet went viral on social media after shardul thakur gets ruled out of lord’s test)

कोहलीने बुधवारी (११ ऑगस्ट) शार्दुल ठाकूर खेळणार नसल्याची माहिती दिली आहे. विराटने स्पष्ट केले आहे की, दुसऱ्या कसोटी सामन्यात देखील भारतीय संघ ४ वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरणार आहे. परंतु, शार्दुल ठाकूर बाहेर झाल्यानंतर त्याच्या ऐवजी ईशांत शर्माला संधी दिली जाऊ शकते.

महत्त्वाच्या बातम्या – 

लॉर्ड्सवर कर्णधार म्हणून कोहली करणार ‘ही’ विराट कामगिरी

ग्रेट भेट! सचिन तेंडुलकरने ‘रौप्यपदक’ विजेत्या मीराबाई चानूशी साधला संपर्क; ‘हे’ ट्विट होतंय व्हायरल

आनंद तर होणारच!! दिल्लीचा ‘हा’ धाकड खेळाडू झाला पूर्णपणे फिट, लवकरच युएईला होणार रवाना

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---