गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील ४०वा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झाला. या सामन्यात हैदराबाद संघाने जबरदस्त प्रदर्शन केले. परंतु अखेर गुजरातने ५ विकेट्स राखून हा सामना जिंकला. या सामन्यात हैदराबादकडून शशांक सिंग याने धडाकेबाज खेळ दाखवला. या ३० वर्षीय भारतीय क्रिकेटपटूने विसाव्या षटकात लॉकी फर्ग्युसनला सलग ३ षटकार खेचले.
क्रिकेटविश्वातील सर्वात वेगवान गोलंदाजांमध्ये गणला जाणारा फर्ग्युसन (Lockie Ferguson) हैदराबादच्या डावातील शेवटचे षटक टाकण्यासाठी आला होता. त्याच्या या षटकातील पहिल्या चेंडूवर मार्को यान्सेनने षटकार खेचला. त्यानंतर दुसरा चेंडू डॉट गेल्यानंतर तिसऱ्या चेंडूनर जेन्सनने एक धाव घेतली आणि स्ट्राईक शशांककडे (Shashank Singh) आली.
शशांकने जगातील या भेदक गोलंदाजांपैकी एक फर्ग्युसनला आपल्या पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार खेचला. आऊटसाइड ऑफला त्याने हा षटकार खेचला. त्यानंतर पुढील चेंडू फर्ग्युसनने खेळपट्टीवरील लाईनच्या थोडा पुढे टाकला. परंतु शशांक हा चेंडू खेळण्यासाठी तयार होता आणि त्याने या चेंडूवर स्कूप शॉट मारत पुन्हा चेंडू षटकारासाठी पाठवला. शेवटी फर्ग्युसनने डावातील अखेरचा चेंडू १४४ च्या किमी दर ताशी वेगाने फेकला, ज्यावर शशांकने मिड ऑफवरून फटका मारत षटकारांची (Shashank Singh’s Six Hattrick) हॅट्रिक केली.
अशाप्रकारे फर्ग्युसनच्या या षटकात यान्सेन आणि शशांकने मिळून एकूण २५ धावा काढल्या. महत्त्वाचे म्हणजे, शशांकने आयपीएलमध्ये फलंदाजी करण्याची ही पहिलीच वेळ होती. त्याने ६ चेंडू खेळताना ४१६च्या स्ट्राईक रेटने झटपट २५ धावा फटकावल्या.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
शशांक क्लिन स्ट्राईकर असण्याबरोबरच ऑफ ब्रेक गोलंदाजही आहे. अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये त्याने काही अविस्मरणीय खेळीही केल्या आहेत. त्याला यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सने विकत घेतले होते. २०१९ मध्ये तो राजस्थान रॉयल्सशी जोडला गेला होता. परंतु हैदराबादने ९ एप्रिल २०२२ रोजी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा देत आयपीएलच्या रणांगणात आपली प्रतिभा दाखवण्याची संधी दिली होती. मात्र त्याला फलंदाजीची संधी मिळाली नव्हती. आता आपल्या सहाव्या आयपीएल सामन्यात त्याला ही संधी मिळाली आणि त्याने या संधीचे सोने करत सर्वांचे लक्ष वेधले आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
राशिद खानने यान्सेनला षटकार खेचल्यानंतर चांगलाच भडकला मुरलीधरन; डगआऊटमध्येच घातला राडा
आधी हातावर लागला जोराचा चेंडू, नंतर स्वस्तात बाद झाला हार्दिक; मग काय पत्नी नताशाचे पडले तोंड
सहा चेंडूत ४१६च्या स्ट्राईक रेटने २५ धावा कुटणारा हैदराबादचा पठ्ठ्या, जाणून घ्या त्याच्याबद्दल