गुजरात टायटन्सने बुधवारी (दि. २७ एप्रिल) सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आयपीएल २०२२च्या ४०व्या सामन्यात शानदार विजय मिळवला. वानखेडे स्टेडिअममध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूपर्यंत कोण सामना जिंकेल असा प्रश्न पडला होता. गुजरात संघाला चांगलाच संघर्ष करावा लागला. विशेष म्हणजे, गुजरातचा फलंदाज राशिद खानने डावाच्या शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर खणखणीत षटकार मारून आपल्या संघाला ५ विकेट्सने विजय मिळवून दिला. हे षटक हैदराबादचा गोलंदाज मार्को यान्सेनने फेकले होते. यावर राशिदने ३ षटकार मारले. यान्सेनच्या गोलंदाजीवर एका पाठोपाठ षटकार मारल्यानंतर हैदराबादच्या डगआऊटमध्ये बसलेले मुथय्या मुरलीधरन यांना राग अनावर झाला. यादरम्यानचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय.
गुजरात संघाला शेवटच्या षटकात विजयासाठी २२ धावांची आवश्यकता होती. यावेळी गुजरातकडून राहुल तेवतिया (Rahul Tewatia) आणि राशिद खान (Rashid Khan) फलंदाजी करत होते. डावाचे शेवटचे षटक टाकण्यासाठी हैदराबादकडून मार्को यान्सेन आला होता. यान्सेनच्या पहिल्याच चेंडूवर तेवतियाने षटकार खेचला. दुसऱ्या चेंडूवर १ धाव घेत त्याने स्ट्राईक राशिदला दिली. तिसऱ्या चेंडूवर राशिद षटकार मारण्यात यशस्वी ठरला. यानंतर चौथा चेंडू निर्धाव गेला. त्यानंतर पुन्हा एकदा पाचव्या चेंडूवर राशिदने षटकार खेचला. शेवटच्या चेंडूवर सामना जिंकण्यासाठी ३ धावांची आवश्यकता होती. राशिदने यान्सेनच्या शेवटच्या चेंडूवरही षटकार मारला आणि हैदराबादच्या तोंडातून विजय हिसकावून नेला. यादरम्यान हैदराबादचे फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक मुथय्या मुरलीधरन (Muttiah Muralitharan) यांना त्यांच्या रागावर संतुलन ठेवता आले नाही.
यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
https://twitter.com/Biscuit8Chai/status/1519376843484561411?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1519376843484561411%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fsports%2Fcricket-ipl-2022-muttiah-muralitharan-loses-cool-as-rashid-smashes-marco-jansen-for-sixes-watch-video-4220623.html
Murali getting Angry during the 20 th over pic.twitter.com/jvcjVh4Kpp
— Kaveen (@Kaveen0607) April 27, 2022
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
राशिद-तेवतियाची विस्फोटक फलंदाजी
या सामन्यात राशिद आणि तेवतियाने विस्फोटक फलंदाजी करत आपल्या संघाला तुफान विजय मिळवून दिला. हैदराबादने पहिल्यांदा फलंदाजी करताना ६ विकेट्स गमावत १९५ धावा केल्या होत्या. मात्र, गुजरात संघाने १९६ धावांचे आव्हान शेवटच्या षटकावर पूर्ण केले. तेवतियाने २१ चेंडूत ४० धावा केल्या. दुसरीकडे राशिदने ११ चेंडूत ३१ धावांची जबरदस्त खेळी केली.
गुजरात संघाने केला टॉप
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध मिळालेल्या शानदार विजयानंतर गुजरात संघाने गुणतालिकेत पुन्हा एकदा अव्वलस्थान पटकावले आहे. हार्दिक पंंड्याच्या नेतृत्वातील गुजरात संघाने आयपीएल २०२२मध्ये ८ सामने खेळले आहेत. यातील ७ सामन्यात त्यांना विजय मिळाला आहे, तर उर्वरित १ सामन्यात त्यांना पराभवाचा धक्का बसला आहे. त्यांचे १४ गुण आहेत. यामुळे गुजरात संघ प्लेऑफच्या आणखी जवळ पोहोचला आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
बिग ब्रेकिंग! इंग्लंडला मिळाला रुटचा वारसदार; बेन स्टोक्स बनला नवा कसोटी कर्णधार
दिल्लीचा सामना पाहून चिडलेला पाँटिंग, ३-४ रिमोटही तोडले होते, स्वत:च केलाय खुलासा
‘ईश्वर म्हणतोय, मी तुम्हाला मदत करतो,’ हार्दिकची हैदराबादविरुद्धच्या रोमांचक विजयानंतर प्रतिक्रिया