---Advertisement---

वेस्ट इंडिज आणि बांगलादेशमध्ये ‘करा वा मरा’ची लढत, पराभूत होणाऱ्या संघाचा संपणार प्रवास!

On: शुक्रवार, ऑक्टोबर 29, 2021 9:49 AM
---Advertisement---

संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे सध्या आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ ची रणधुमाळी सुरू आहे. पात्रता फेरीनंतर आता सुपर-१२ फेरीचा टप्पा सुरू असून सर्व सहभागी संघांचा किमान १ सामना पार पडला आहे. शुक्रवार रोजी (२९ ऑक्टोबर) शारजाह येथे पहिल्या गटातील वेस्ट इंडिज आणि बांगलादेश संघ आमने सामने येणार आहेत. विश्वचषकातील हा २३ वा सामना असून उभय संघांसाठी या सामन्यात ‘करा अथवा मरा’ची स्थिती निर्माण झाली आहे. कारण या सामन्यात पराभूत होणाऱ्या संघाचा विश्वचषकातील प्रवास जवळपास संपुष्टात येईल.

२ वेळच्या टी२० विश्वचषक विजेत्या वेस्ट इंडिज संघाला अद्याप त्यांच्या विजयाचे खाते उघडता आलेले नाही. या संघाला इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका संघांच्या हातून पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर पात्रता फेरीतील शानदार प्रदर्शनानंतर सुपर १२ फेरीत प्रवेश करणाऱ्या बांगलादेश संघाच्या हातीसुद्धा निराशाच आली आहे. त्यांना इंग्लंड आणि श्रीलंकेने पराभूत केले आहे. त्यामुळे या संघांना उपांत्य सामन्यातील त्यांच्या अपेक्षा जिवंत ठेवण्यासाठी हा सामना जिंकणे आवश्यक असेल.

टी२० विश्वचषकात वेस्ट इंडिज आणि बांगलादेश संघ आतापर्यंत २ वेळा आमने सामने आले आहेत. यातील एका सामन्यात बांगलादेश संघाने बाजी मारली आहे. तर वेस्ट इंडिजच्या पारड्यातही एक विजय आला आहे. तर आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये या संघांनी १२ सामने खेळले असून वेस्ट इंडिजचे पारडे किंचित जड आहे. त्यांनी ६ सामने जिंकले असून बांगलादेशला ५ सामने जिंकता आले आहेत. तर एका सामन्याचा निर्णय लागलेला नाही. त्यामुळे या सामन्यात दोन्ही संघांचे पारडे तितकेच जड असून त्यांच्यामध्ये विजयासाठी अटीतटीची लढत पाहायला मिळू शकते.

वेस्ट इंडिजची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
लिंडल सिमन्स, एविन लुईस, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), ख्रिस गेल, कायरन पोलार्ड (कर्णधार), आंद्रे रसेल, शिमरॉन हेटमायर, ड्वेन ब्रावो, हेडन वॉल्श, अकिल होसेन, रवी रामपॉल

बांगलादेशची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
मोहम्मद नईम, लिटन दास, शाकिब अल हसन, मुशफिकुर रहीम, महमुदुल्ला (कर्णधार), अफिफ हुसैन, नुरुल हसन (यष्टीरक्षक), महेदी हसन, शॉरीफुल इस्लाम, नसुम अहमद, मुस्तफिजुर रहमान

महत्त्वाच्या बातम्या-

टी२० विश्वचषकाच्या रणधुमाळीत ‘या’ स्टार वेगवान गोलंदाजाने सोडला भारतीय संघ, परतला मायदेशी

वाह! श्रीलंकेविरुद्ध कसोटी अन् वनडेत जो विक्रम सचिन-युनूसने केला, तसा टी२०मध्ये वॉर्नरने करून दाखवला

फिंचचा मोठा कारनामा! ‘हा’ विक्रम करणारा ठरला ऑस्ट्रेलियाचा पहिलाच पुरुष क्रिकेटर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---