वेस्ट इंडिज संघाविरुद्ध पहिला सामना जिंकल्यानंतर भारतीय संघ आता दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज झाला आहे. गुरुवारपासून (दि. 20 जुलै) वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात त्रिनिदाद येथे दुसऱ्या सामन्याला सुरुवात होत आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. कारण, दोन्ही संघातील हा 100वा ऐतिहासिक कसोटी सामना आहे. तसेच, वेस्ट इंडिज संघ पहिल्या सामन्यातील पराभवाचा बदला घेण्याचाही प्रयत्न करेल, तर भारतीय संघ हा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याचा प्रयत्न करेल. चला तर दुसऱ्या सामन्याविषयी सर्वकाही जाणून घेऊयात…
भारतीय संघाने पहिल्या कसोटीत वेस्ट इंडिज संघाला 1 डाव आणि 141 धावांनी पराभूत केले होते. भारतीय संघाचे फलंदाज सध्या चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. अशात या सामन्यातही असेच काहीसे दिसेल असे बोलले जात आहे. भारतीय संघाच्या मजबूत फलंदाजी क्रमाचा सामना करण्यासाठी वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना असामान्य प्रदर्शन करावे लागेल. मात्र, हे त्यांच्यासाठी सोपे नसेल.
ऍशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला, तर कसोटी क्रमवारीत भारताच्या जागेला धक्का बसेल. अशात, सामना जिंकण्यावर भारताचे लक्ष असेल. तसेच, घरच्या मैदानावर हा सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्याचा वेस्ट इंडिज संघाचा प्रयत्न असेल. या सामन्यातही भारताचे पारडे जड असल्याचे दिसत आहे.
भारताने जिंकलेत सलग 7 कसोटी सामने
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) संघात आतापर्यंत 99 कसोटी सामने खेळले गेले आहेत. पहिला सामना 1948मध्ये दिल्ली येथे खेळला गेला होता. यामधील 30 सामन्यात वेस्ट इंडिजने विजय मिळवला आहे. तसेच, भारताने 23 सामन्यात विजय मिळवला आहे. 46 कसोटी सामने अनिर्णित राहिले आहेत. मात्र, मागील 21 वर्षांपासून वेस्ट इंडिजने भारताविरुद्ध कोणताही कसोटी सामना जिंकला नाहीये. यादरम्यान दोन्ही संघांनी 24 कसोटी सामने खेळले आहेत. त्यात भारताला 15 सामन्यात विजय मिळवता आला आहे. तसेच, 9 सामने अनिर्णित राहिले आहेत. 2016नंतर दोन्ही संघात खेळली गेलेली 2 सामन्यांची ही चौथी कसोटी मालिका आहे. तसेच, भारताने यातील सलग 7 सामने जिंकले आहेत. पोर्ट ऑफ स्पेनमध्ये भारतीय संघ आपला हा विक्रम कायम राखण्याचा प्रयत्न करेल.
विराटचा 500वा कसोटी सामना
विशेष म्हणजे, दोन्ही संघांसोबतच भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याच्यासाठीही दुसरा कसोटी सामना खास आहे. हा विराट कोहलीचा 500वा आंतरराष्ट्रीय सामना आहे. त्यामुळे आता तो या सामन्यात कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दुसऱ्या कसोटीसाठी उभय संघांची संभावित प्लेइंग इलेव्हन
वेस्ट इंडिज
क्रेग ब्रेथवेट (कर्णधार), तेजनारायण चंद्रपॉल, किर्क मॅकेंझी, ऍलिक अथानाजे, जर्मेन ब्लॅकवूड, जोशुआ डा सिल्वा, जेसन होल्डर, केविन सिंक्लेयर/रहकीम कॉर्नवाल, अल्झारी जोसेफ, केमार रोच, शॅनन गेब्रियल
भारत
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयसवाल, शुबमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, ईशान किशन, आर अश्विन, शार्दुल ठाकूर/नवदीप सैनी, जयदेव उनादकट, मोहम्मद सिराज
खेळपट्टी आणि हवामान
दुसऱ्या कसोटीसाठी पोर्ट ऑफ स्पेन (Port of Spain) येथील मैदानाच्या खेळपट्टीविषयी बोलायचं झालं, तर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा होईल. मात्र, सामना पुढे सरकताच खेळपट्टी संथ होईल. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय योग्य असल्याचे म्हटले जात आहे. हवामानाविषयी बोलायचं झालं, तर आकाशात ढगाळ वातावरण असेल. तसेच, सामन्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यताही आहे.
सामन्याचे थेट प्रक्षेपण
भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सामना सुरू होईल. हा सामना जिओ सिनेमा ऍपवर आणि वेबवर लाईव्ह पाहता येईल. तसेच, डीडी स्पोर्ट्सवरही सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल. (wi vs ind 2nd port of spain test match preview live streaming records know here)
महत्त्वाच्या बातम्या-
‘काका-पुतण्याची मस्त मज्जा’, इरफानच्या पुतण्यासोबतच्या डान्स व्हिडिओवर नेटकऱ्याची लक्षवेधी कमेंट
लय भारी! वेगाने धावा काढणाऱ्या मार्शचा बेअरस्टोने ‘असा’ काढला काटा, अविश्वसनीय कॅच तुम्हीही पाहाच