दक्षिण आफ्रिका संघाने पाचव्या टी20 मध्ये वेस्ट इंडिजचा 25 धावांनी पराभव केला. यासह संघाने ही मालिका 3-2 ने जिंकली. या सामन्यातप्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 4 गडी राखून 168 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल वेस्ट इंडिज संघ 9 विकेट्सवर 143 धावा करू शकला. जरी वेस्ट इंडिज संघाने ही टी20 मालिका गमावली असेल. पण गोलंदाज ड्वेन ब्राव्हो याने मालिकेत आश्चर्यकारक कामगिरी केली आहे.
त्याने या मालिकेतील 5 सामन्यांत एकूण 10 बळी घेतले. या मालिकेत तो सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. दरम्यान त्याने एका सामन्यात 7 पेक्षा कमी इकोनाॅमीने धावा दिल्या आणि 4 बळीही घेतले.
याखेरीज 37 वर्षीय ब्राव्होने ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेटमध्ये 500 हून अधिक बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. एकूण 482 ट्वेंटी ट्वेंटी सामन्यात त्याने 527 बळी घेतले आहेत. दरम्यान त्याने 10 वेळा एका डावात 4 बळी आणि 2 वेळा एका डावाच 5 बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. याशिवाय त्याने 6368 धावाही केल्या आहेत.
चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणार्या ड्वेन ब्राव्होला यंदाच्या टी20 विश्वचषकातही आपली कामगिरी कायम राखणे आवडेल. वेस्ट इंडिजने दोनदा टी20 विश्वचषक जिंकला आहे. तो दोन्ही वेळा संघाचा भाग होता. वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्त्व करताना विश्वचषकामध्ये सर्वाधिक 25 विकेट घेण्याचा विक्रमही ब्राव्होच्या नावावर आहे.
टी20 विश्वचषकाचे सामने ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये युएई आणि ओमानमध्ये होणार आहेत. सुरुवातीला विश्वचषक सामने भारतात होणार होते. परंतु कोरोनामुळे विश्वचषक भारतातून इतरत्र हालवण्यात आले आहे. वेस्ट इंडिज संघाला टी20 विश्वचषक सामने खेळण्यासाठी पात्रता फेरी सामने खेळावे लागणार आहेत.
महत्वाच्या बातम्या-
एकेकाळच्या जग्गजेत्या श्रीलंकन संघाची आज का झाली आहे दारूण अवस्था? घ्या जाणून
इंग्लंड वि. श्रीलंका वनडे मालिका: श्रीलंकेचा व्हाईटवॉश हुकला, पावसामुळे तिसरा सामना रद्द
मानलं पाहिजे राव! दिल्लीकर फलंदाजाचा टी२०त धुमाकूळ, अवघ्या ७९ चेंडूत झळकावले द्विशतक






