महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाहीये. याच पार्श्वभूमीवर स्मृती मंधाना हिच्या नेतृत्वातील आरसीबीवर मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसते. सलग पाच सामन्यात पराभव स्वीकारल्यानंतर आरसीबीने एखेर यूपी वॉरिअर्सला पराभत करत पहिला विजय मिळवला. पण तरीदेखील संघावर होणाऱ्या टीका थांबल्या नाहीत. अशातच भारतीय संघाचे माजी दिग्गज वेंकटेश प्रसाद यांनी आपल्या महिला आरसीबी संघाला मिळणाऱ्या संघाचे कारण सांगितले.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलेर () फ्रँचायझीसाठी इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलमध्ये अनेक दिग्गज खेळले आहेत. पण तरीहीदेखील आयपीएलच्या 15 हंगामांमध्ये आरसीबीला एकही ट्रॉफी जिंकता आली नाही. सोबतच विराट कोहली (Virat Kohli), एबी डिविलियर्स (AB de Villiers) आणि ख्रिस गेल (Chris Gayle) अशा दिग्गजांच्या वारसा या फ्रँचायझीला असल्याने महिला आरसीबी संघावर दबाव होता, असे वेंकटेश प्रसाद (Venkatesh Prasad) यांना वाटते. महिला आरसीबीवर आधिपासूनच हा सर्व दबाव असल्याने, संघ पराभूत होत असल्याचे मत, माजी वेगवान गोलंदाजाने व्यक्त केले.
वेंकटेश प्रसाद स्पोर्ट्स 18 आणि जिओ सिनेमाच्या एक्स्पर्ट पॅनलचा भाग आहेत. माध्यमांशी बोलत असताना प्रसाद यांना महिला आरसीबीच्या सुमार प्रदर्शनावर प्रश्न विचारला गेला. यावेळी संती संघाच्या या निराशाजनक प्रदर्शनाचे कारण सांगण्याचा प्रयत्न केला. प्रसाद म्हणाले, “पुरुष संघ एकही आयपीएल ट्रॉफी जिंकला नाहीये. याच गोष्टीचा दबाव महिला संघावर दिसतो. त्यामुळेच पहिला सामना गमावल्यानंतर महिला संघासाठी पुनरागमन करणे कठीण राहिले.”
दरम्यान, आरसीबी महिला संघाची कर्णधार स्मृती मंधाना डब्ल्यूपीएलच्या पहिल्या हंगामात सर्वात महागडी खेळाडू ठरली. स्मृतीला ताफ्यात घेण्यासाठी आरसीबीने 3.4 कोटी रुपये खर्च केले. असे असले तरी, स्मृती कर्णधार म्हणून आणि वैयक्तिक प्रदर्शनाच्या बाबतीत समाधानकारक कामगिरी करू शकली नाहीये. प्रसाद यांनी मंधानाच्या प्रदर्शनावर देखील पुढे मत व्यक्त केले.
स्मृती मंधानाविषयी काय म्हणाले वेंकटेश प्रसाद
“सर्वात महागडी खेळाडू आहेच, पण स्मृती विराट कोहली, एबी डिविलियर्स आणि ख्रिस गेल खेळलेल्या संघाकडून खेळत आहे. त्यामुळे तिच्यावर सुरुवातीपासूनच दबाव आहे. तिला वैयक्तिक धावा करता आल्या नसल्याने नेतृत्व देखील काही खास दिसत नाहीये. तुम्ही धावा करत नसास पण तुमचा संघ जिंकत असेल, तरीदेखील कोणी प्रश्न उपस्थित करत नाही. पण याठिकाणी सर्वच गोष्टी मंधानाच्या विरोधात घडताना दिसत आहेत.” दरम्यान, स्मृतीची डब्ल्यूपीएल 2023 मधील सर्वात मोठी धावसंख्या 35 राहिली आहे. यूपी वॉरिअर्सविरुद्धच्या सामन्यात तिला एकही धाव करता आली नव्हती.
(Women’s RCB performing poorly as men’s team fails to win a single IPL says Venkatesh Prasad)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
प्रेडीक्शन टाईम! गेलला वाटतेय ‘हा’ भारतीय तोडू शकतो त्याचा 175 धावांचा आयपीएल रेकॉर्ड
एका पराभवाने खचला ऑस्ट्रेलियन क्रिकेटर; म्हणाला, ‘आम्ही राहुलसारखी फलंदाजी…’