पुढील महिन्यात बांगलादेशमध्ये आशियाई एकादश विरुद्ध विश्व एकादश (Asia XI vs World XI) या संघामध्ये दोन आंतरराष्ट्रीय टी20 सामने होणार आहेत. या सामन्यांसाठी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने विश्व एकादश आणि आशिया एकादश संघातील खेळाडूंची घोषणा केली आहे.
विश्व एकादश संघात वेस्ट इंडिजचे ख्रिस गेल, किरॉन पोलार्ड, शेल्डन कॉट्रेल आणि निकोलस पूरन हे खेळाडू आहेत. तर ऍलेक्स हेल्स आणि जॉनी बेअरस्टो या इंग्लंडच्या खेळाडूंचा समावेश आहे. तर ऑस्ट्रेलियाचा अँड्र्यू टाय हा एकमेव खेळाडू विश्व एकादश संघात आहे.
तसेच दक्षिण आफ्रिकेचे फाफ डू प्लेसिस, लुंगी एन्गिडी हे खेळाडू देखील या संघात आहे. त्याचबरोबर डू प्लेसिस या संघाचा कर्णधार असणार आहे. तर टॉम मुडी या संघाचे प्रशिक्षक असतील.
त्याचबरोबर आशियाई एकादश संघात भारताचा कर्णधार विराट कोहलीसह 6 भारतीय खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. या संघात सर्वाधिक भारतीय खेळाडू आहेत. यात कोहलीसह, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, शिखर धवन, रिषभ पंत आणि केएल राहुल या भारतीय खेळाडूंचा समावेश आहे.
तसेच भारतीय खेळाडूंपैकी राहुल फक्त एका सामन्यासाठी उपलब्ध असेल, तर कोहलीच्या या सामन्यांसाठीच्या उपलब्धतेबद्दल नंतर निर्णय घेतला जाईल.
याबरोबरच आशियाई संघात बांगलादेश संघाचे 4 खेळाडूंना, तर श्रीलंका आणि अफगाणिस्तानच्या प्रत्येकी 2 खेळाडूंना या संघात स्थान देण्यात आले आहे. तसेच नेपाळच्या संदीप लामिछानेलाही या संघात स्थान देण्यात आले आहे.
आशियाई एकादश विरुद्ध विश्व एकादश संघात होणाऱ्या टी20 सामन्यांचे आयोजन बांगलादेशचे राष्ट्रपिता शेख मुजीब-उर-रहमान यांच्या जन्मशताब्दी निमित्त केले जात आहे. आयसीसीने त्यांना आंतरराष्ट्रीय सामन्यांचा दर्जा दिला आहे. या 2 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 18 मार्च आणि दुसरा सामना 21 मार्चला शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियम (Sher-e-Bangla National), ढाका (Dhaka) येथे पार पडणार आहे.
असे असतील संघ –
विश्व एकादश – अॅलेक्स हेल्स, ख्रिस गेल, फाफ डू प्लेसिस(कर्णधार), निकोलस पूरन, ब्रेंडन टेलर, जॉनी बेअरस्टो, किरॉन पोलार्ड, आदिल रशीद, शेल्डन कोट्रेल, लुंगी एन्गिडी, अँड्र्यू टाय, मिशेल मॅकक्लेनाघन
आशियाई एकादश – केएल राहुल, शिखर धवन, विराट कोहली, रिषभ पंत, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, थिसेरा परेरा, लसिथ मलिंगा, राशिद खान, मुजीब उर रहमान, मुस्तफिजुर रहमान, तमीम इक्बाल, मुश्फिकुर रहीम, लिटन दास, संदीप लामिछाने
असे असेल बांगलादेशमधील आशियाई एकादश विरुद्ध विश्व एकादश संघातील टी20 सामन्यांचे वेळापत्रक-
18 मार्च – पहिला टी20 सामना – सायं 6 वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार) – शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियम, ढाका.
21 मार्च – दुसरा टी20 सामना – सायं 6 वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार) – शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियम, ढाका.
https://twitter.com/Maha_Sports/status/1232293737566547969
https://twitter.com/Maha_Sports/status/1232280774222794754