भारतीय संघाचा माजी खेळाडू युवराज सिंगने 2019 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि बीसीसीआयच्या अंतर्गत होणाऱ्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. परंतु त्याने पंजाब क्रिकेट संघाच्या विनंतीनुसार निवृत्तीतून माघारी घेण्याचे ठरवले आहे. त्यामुळे त्याने बीसीसीआयला एका पत्राद्वारे निवृत्तीमधून बाहेर पडण्यासाठी विनंती केली होती. ही विनंती बीसीसीआयने अमान्य केली आहे. त्यामुळे त्यावर आता युवराजचे वडील योगराज सिंग यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भारतीय संघाचा माजी खेळाडू युवराज सिंगने 2019 साली निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर पंजाब क्रिकेट संघटनेने युवराज सिंगला विनंती केली होती की, त्याने आपल्या निवृत्तीवर पुनर्विचार करावा. ज्यामुळे तो पंजाब संघासाठी क्रिकेट खेळू शकेल. त्याचबरोबर तो युवा खेळाडूंना तयार करेल आणि मार्गदर्शन सुद्धा करू शकेल.
यावर युवराज सिंगने विचार केला आणि निवृत्तीतून माघार घेवून पंजाब संघाकडून क्रिकेट खेळण्यासाठी बीसीसीआयला विनंतीचे एक पत्र पाठवले होते. मात्र बीसीसीआयने या पत्राला मान्यता दिली नाही. त्याचबरोबर अमान्य करण्याचे कारण सुद्धा सांगितले नाही. त्यामुळे त्याचे वडील योगराज सिंग म्हणाले बीसीसीआयने निवृत्ती मागे घेण्याचा विचार करावा आणि युवराजला युवा खेळाडूंना घडविण्याची संधी द्यावी.
योगराज सिंग म्हणाले, “मला, बीसीसीआयने का परवानगी दिली नाही हे निश्चितपणे माहीत नाही. अजून ही माझे युवराज सोबत बोलणे झालेले नाही. परंतु, हा निर्णय पूर्णपणे बीसीसीआयचा आहे. मला वाटते निवृत्त खेळाडूंना पुनरागमन करण्याची आणि युवा खेळाडूंसोबत खेळण्याची संधी दिली पाहिजे. त्यांच्याकडून शिकण्यासाठी खूप काही आहे. ”
युवराज सिंग हा 2007 साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा सदस्य होता. त्याने 2007 साली झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला विजेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. त्याने या स्पर्धेत इंग्लंड विरुद्ध खेळताना एका षटकात सलग सहा षटकार मारण्याचा कारनामा केला होता. या स्पर्धेत त्याने सर्वाधिक वेगवान अर्धशतक ठोकण्याचा विक्रम आपल्या नावावर केला होता.
युवराज सिंग 2011 साली भारतात झालेल्या वनडे विश्वचषक स्पर्धेच्या विजेता भारतीय संघाचाही सदस्य होता. या संपूर्ण स्पर्धेत युवराज सिंगने दमदार प्रदर्शन केले होते. त्यामुळे मॅन ऑफ द् टूर्नामेंट हा पुरस्कार देण्यात आला होता. या स्पर्धेत बर्याच सामन्यात युवराज सिंगने भारताला विजय मिळवून दिले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
तिसऱ्या कसोटीत उमेश यादवची जागा घेण्यासाठी ‘हे’ दोन गोलंदाज शर्यतीत
“टीम इंडियात स्टोक्सची भूमिका साकारतोय जडेजा”, माजी भारतीय दिग्गजाने थोपटली पाठ
साल २०१३ मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या खेळाडूची ७ वर्षांनी निवृत्तीची घोषणा