इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात गुजरात टायटन्स संघाचा सलामीवीर शुबमन गिल याने तुफानी खेळी केली. त्याने संघासाठी नाबाद 104 धावा केल्या. त्याच्या या खेळीच्या जोरावर गुजरात संघाने आरसीबीला या सामन्यात 6 विकेट्सने पराभूत केले. या सामन्यात विराट कोहली यानेही नाबाद 101 धावांची खेळी केली होती. मात्र, गिलच्या खेळीने विराटच्या खेळीवर पाणी फेरले. तसेच, या विजयानंतर मुंबई इंडियन्स संघानेही प्ले-ऑफमध्ये आपली जागा पक्की केली. त्यानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याने एक वेगळी मागणी केली आहे.
मुंबईने आपला अखेरचा सामना जिंकून 16 गुणांसह चौथे स्थान पटकावले होते. मात्र, अखेरच्या सामन्यात गुजरातने आरसीबीला पराभूत करणे अनिवार्य होते. कारण, आरसीबीने एका धावेने विजय मिळवला तरी ते प्ले ऑफसाठी पात्र ठरणे नक्की होते. 198 या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना गिलने गुजरातला विजय मिळवून दिला आणि मुंबईला पुढे जाण्याची संधी मिळाली. त्यानंतर युवराज सिंगने एक व्हिडिओ पोस्ट करत मुंबई इंडियन्सने आता गिलला एक कार गिफ्ट करावी असे म्हटले.
त्याने या व्हिडिओमध्ये म्हटले,
https://www.instagram.com/reel/CshAqTIhRAa/?igshid=NTc4MTIwNjQ2YQ==
“विराटने एक अप्रतिम शतक झळकावले. मात्र, गिलचे प्रत्युत्तर चांगले होते. याचा थेट मुंबईला फायदा झाला. आता मुंबईने त्याला एक कार गिफ्ट करावी.”
बेंगलोरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअममध्ये पावसामुळे सामना एक तास उशिरा सुरू झाला. या सामन्यत गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी आरसीबीने पॉवर प्लेमध्ये एकही विकेट न गमावता 62 धावा केल्या होत्या. मात्र, यानंतर पुढच्या तीन षटकात त्यांचा डाव ढासळला. मात्र, विराट टिकून राहिला आणि त्याने टिच्चून फलंदाजी केली. सहाव्या विकेटसाठी विराट आणि अनुज रावत यांच्यात नाबाद 64 धावांची भागीदारी झाली. त्यामुळे संघ कठीण स्थितीतून वर आला. मात्र, आरसीबीसाठी विराटने जे केले, तेच गुजरातसाठी गिलने करून संघाला विजयी केले. यासह मुंबईला प्ले ऑफचे तिकीट मिळाले.
(Yuvaraj Singh Suggest Mumbai Indians To Gift Car To Shubman Gill After His Century)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘लोकांना वाटतंय माझा टी20चा स्तर…’, सतत ट्रोल करणाऱ्यांना विराटने एकदाच दिले उत्तर
‘आता वेळ आलीये, विराटने RCB सोडून…’, पीटरसनचा कोहलीला ‘या’ संघाकडून खेळण्याचा सल्ला
सचिनकडून कौतुक होताच मॅचविनर गिलने शेअर केला शर्टलेस फोटो, 3 तासात पडला 1 मिलियन लाईक्सचा पाऊस