मागच्या महिन्यात इंग्लंड दौरा गाजवल्यानंतर भारतीय महिला संघ आशिया चषक खेळत आहे. संघाने आशिया चषकाची सुरुवात विजयाने केली. पहिल्या सामन्यात यजमान श्रीलंकन संघाला त्यांनी 41 धावांनी धूळ चारली. भारतीय संघाने या सामन्यात उत्कृष्ट प्रदर्शन केले, पण डावातील शेवटच्या षटकात पंचांनी एक असा निर्णय दिला, ज्यामुळे चाहते नाराज आहेत. भारतीय संघाचा माजी दिग्गज अष्टपैलू युवराज सिंग यानेही याबाबत नराजी व्यक्त केली.
भारताने या सामन्यात मर्यादित 20 षटकांमध्ये 6 विकेट्सच्या नुकसानावर 150 धावा केल्या. जेमिमा रॉड्रिग्ज (Jemimah Rodrigues ) हिने 53 चेंडूत 76 धावांची सर्वोत्तम खेळी केली. तसेच कर्णधार हमनप्रीत कौर 33 धावांची खेळी केली. गोलंदाजी विभागात दयालन हेमलथा 15 धावा खर्च करून सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. भारतीय संघासाठी या सामन्यात सर्व गोष्टी ठीकठाक सुरू होत्या. परंतु फलंदाजीच्या वेळी शेवटच्या षटकात पंचांनी दिलेला निर्णय अनेकांना पटला नाही. या षटकातील पाचव्या चेंडूवर पूजा वस्त्राकर (Pooja Vastrakar ) हिला विकेट गमवावी लागली.
Pooja Vastrakar's bizarre run out decision in Women's Asia Cup 2022.https://t.co/5SB6sWgCl7
— CRICPUR (@cricpur) October 1, 2022
पूजा वस्त्राकरला पंचांनी धावबाद दिले. पण अनेकांनी या निर्णयाशी असहमती दर्शवली. कारण व्हिडिओ रिप्लेमध्ये हे स्पष्ट दिसत होते की, पूजाने बॅट क्रीजवर टेकवली होती, पण तिसऱ्या पंचांनी तरीदेखील तिला बाद दिले. मैदानात उपस्थित श्रीलंकन खेळाडूंना देखील विकेटची कसलीही खात्र नव्हती. परंतु पंचांच्या निर्णयामुळे पूजाला खेळपट्टी सोडावीच लागली. दिग्गज युवराज सिंग (Yograj Singh) देखील पंचांच्या निर्णयामुळे नाराज दिसला. त्याने ट्वीट करत लिहिले की, “तिसऱ्या पंचांचा हा निर्णय़ खूपच खराब होता. तिला एक संधी मिळाली पाहिजे होती.”
That’ is such a poor decision by the third umpire ! Should have given pooja vastrakar benefit of doubt !! #indiavssrilanka #WomensAsiaCup
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) October 1, 2022
गोलंदाजी करताना पूजाचे उत्कृष्ट प्रदर्शन –
पूजा या सामन्यात भारताच्या डावातील शेवटच्या षटकात फलंदाजीसाठी आली आणि याच षटकात विकेट देखील गमावली. असे असले तरी, संघ गोलंदाजी करण्यासाठी आल्यावर तिने उत्कृष्ट प्रदर्शन केले. पूजाने टाकेलल्या 3 षटकांमध्ये 12 धावा खर्च करून 2 विकेट्स घेतल्या. अष्टपैलू दिप्ती शर्माने दोन आणि राधा यादवने एक विकेट घेतली. श्रीलंकन संघाने 18.2 षटकांमध्ये 109 धावा करून सर्व विकेट्स घमावल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
बुमराहच्या फिटनेसविषयी चांगली बातमी; स्ट्रेस फ्रॅक्चर नाही, ‘ही’ साधी दुखापत झालीये
INDvSA: किंग कोहलीच्या खास यादीत समाविष्ट होण्याची सूर्याला संधी! केवळ एवढ्याच धावांची आवश्यकता