भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने काही दिवसांपुर्वी मोठा खुलासा केला होता. त्याची पत्नी अनुष्का शर्मा प्रेग्नेन्ट आहे आणि जानेवारीमध्ये ते दोघे आई-वडील बनतील, असे त्याने सांगितले होते. विराटनंतर आता भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहिर खाननेही आनंदाची बातमी दिली आहे. तोदेखील लवकरच वडील बनणार आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, झहीरच्या जवळच्या मित्राने या गोष्टीचा खुलासा केला आहे. झहीर आणि त्याची पत्नी सागरिका घाटगे हे लवकरच आई-वडील बनणार आहेत, असे त्याने सांगितले आहे.
आयपीएलच्या मुंबई इंडियन्स संघाचा वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक झहीर सध्या त्याच्या पत्नीसोबत युएईत आहे. त्याच्या वाढदिवसादिवशी सागरिकाने काळ्या रंगाच्या सैल असा ड्रेस घातला होता. त्यावेळी तिचा बेबी बंप दिसत होता. २०१७ साली त्यांचे लग्न झाले होते. त्यावेळी त्यांनी निवडक व्यक्तींना बोलवून कोर्ट मॅरेज केले होते. पण त्यानंतर त्यांनी शानदार रिसेप्शन पार्टी दिली होती.
सागरिका ही बॉलिवूड अभिनेत्री आहे. शाहरुख खानच्या हॉकीशी संबंधित असलेल्या ‘चक दे इंडिया’ या प्रसिद्ध चित्रपटात तिने अभिनय केला होता. याव्यतिरिक्त ती बऱ्याच चित्रपट आणि वेबसीरिजमध्येही दिसून आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
एका भारतीयासह जगातील दिग्गज क्रिकेट संघ पाकिस्तानात होणार क्वारंटाईन?
अय्यर-धवनसारखे फलंदाज असूनही का मुंबईविरुद्ध दिल्ली हारली, कृणालने सांगितले कारण
ट्रेंडिंग लेख-
सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज टी नटराजन का आहे इतका खास?
विरोधी संघ खुश..! आयपीएल २०२०मध्ये बिघडला या ३ स्टार खेळाडूंचा फॉर्म
“मिड सीझन ट्रान्सफर” नियमामुळे ‘हे’ ४ भारतीय करु शकतात आयपीएलमध्ये कमबॅक