पाकिस्तानचा संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर असून उभय संघात टी२० मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील हरारे स्पोर्ट्स क्लबवर खेळवल्या गेलेल्या दुसर्या टी२० सामन्यात झिम्बाब्वेने पाकिस्तानचा १९ धावांनी पराभव केला. यासह तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत १-१ अशी बरोबरी झाली आहे. झिम्बाब्वेच्या या थरारक विजयात वेगवान गोलंदाज ल्यूक जोन्ग्वे याने मोलाचे योगदान दिले. त्याच्या विलक्षण प्रदर्शनानंतर सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे.
२६ वर्षीय जॉन्ग्वेने एकदा त्याच्या स्वप्नासंदर्भात मोठा उलगडा केला होता. आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटद्वारे ट्विट करत त्याने लिहिले जगप्रसिद्ध इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. ‘एक दिवस मीही आयपीएल खेळेन,’ असे त्याने ट्विटमध्ये लिहिले होते.
पाकिस्तानविरुद्धच्या प्रशंसनीय कामगिरीनंतर त्याच्या या जुन्या ट्विटची चर्चा रंगली आहे. अनेकांनी त्याच्या या ट्विटचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे, जो वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.
Luke Jongwe – The man who dismantled Pakistan batting in Zimbabwe's first ever T20I win against Pakistan dreams of playing IPL. (Tweet from 2017)#Cricket #ZIMvPAK @mipaltan @PunjabKingsIPL @KKRiders @RCBTweets @SunRisers @DelhiCapitals @rajasthanroyals @ChennaiIPL @ZimCricketv pic.twitter.com/3u8A46gXri
— Mohsin Tunvar (@mohsin_tunvar) April 24, 2021
Luke Jongwe, who dismantled Pakistan's batting unit in Zimbabwe's first ever T20I win over Pakistan, dreams of playing IPL. (Tweet from 2017) pic.twitter.com/Dj8v6vHdsm
— CricketTimes.com (@CricketTimesHQ) April 24, 2021
Luke Jongwe – The man who dismantled Pakistan batting in Zimbabwe's first ever T20I win against Pakistan dreams of playing @IPL. (Tweet from 2017)#RohitSharma#PAKvZIM pic.twitter.com/PyV8YIzti3
— @SafdarKtk (@Safdarktk345) April 23, 2021
झिम्बाब्वेच्या या गोलंदाजाने पाकिस्तानविरुद्धच्या टी२० सामन्यात ४ विकेट्स घेतल्या होत्या. ३.५ षटके गोलंदाजी करताना अवघ्या १८ धावा देत त्याने पाकिस्तानला धक्क्यावर धक्के दिले होते. त्यातही पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमची विकेट अतिशय महत्त्वपुर्ण ठरली होती. अर्धशतकानजीक पोहोचलेल्या आझमच्या खेळीवर त्याने अंकुश लावला होता. ४१ धावांवर विस्ले माधवेरेच्या हातून त्याने आझमला झेलबाद केले होते.
त्याच्या या दमदार कामगिरीमुळे पाकिस्तानचा संघ अवघ्या ९९ धावांवर सर्वबाद झाला होता आणि झिम्बाब्वेने १९ धावांनी दुसरा टी२० सामना खिशात घातला. अशात जोन्ग्वेची कामगिरी पाहता त्याला आयपीएल २०२२ मध्ये कोणी खेरदीदार मिळेल का नाही? हे पाहावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या-
पंजाबच्या ‘या’ शिलेदाराने बलाढ्य चेन्नईविरुद्ध झळकावले होते शतक, तरीही मिळाली नाही टीम इंडियात जागा
गोलंदाजी करता येईना अन् फलंदाजीही जमेना, अष्टपैलू हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सवर बनलाय ओझं!
चार सामन्यात ना षटकार ना अर्धशतक, मुंबईतील ‘या’ खेळाडूला डच्चू देण्याच्या मागणीने धरला जोर