नोवाक जोकोविचने विम्बल्डन २०२२च्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाचा निक किर्गियोसचा पराभव केला. त्याच्या कारकिर्दीतील २१वे ग्रॅंडस्लॅम जिंकले आहे. त्याचे हे विम्बल्डनचे ७वे जेतेपद ठरले आहे. वर्षातील तिसऱ्या ग्रँडस्लॅमच्या अंतिम सामन्यात खेळताना सर्बियाच्या जोकोविचने किर्गियोसला ४-६, ६-३, ६-४, ७(७)-६(३) असे सलग तीन सेटमध्ये पराभूत केले. जोकोविचचा कारकिर्दीतील हा ३२ वा ग्रँडस्लॅम स्पर्धेचा अंतिम सामना होता. तर २७ वर्षीय किर्गियोस हा कारकिर्दीतील पहिलाच ग्रँडस्लॅमचा अंतिम सामना होता.
ही स्पर्धा जिंकल्यावर नोवाक जोकोविच (Novak Djoovic) याला १९.२३ कोटी रूपयांचे बक्षीस मिळाले आहे. यामुळे जोकोविचच्या संपत्तीचा विचार केला असता तो सगळ्यांच्या पुढे आहे असे दिसून आले आहे. चाहते नेहमी भारताचे महान फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांची एकूण संपत्ती किती यामध्ये अधिक रस घेतात. मात्र जोकोविचची संपत्ती पाहिली तर तो आकडा पाहून त्यांना धक्काच बसणार आहे.
भारताचा माजी कर्णधार कोहलीची संपत्ती ८९२ कोटी रुपयाच्या आसपास आहे. त्याची महिन्याची कमाई ४ कोटी रुपये एवढी आहे. तर वर्षाची कमाई ४८ कोटी रुपयांच्या आसपास जाते. तो इंडियन सुपर लीगमध्ये एफसी गोवा या संघाचा सहमालक आहे. तसेच तो जाहिरातींमधूनही बक्कळ कमाई करतो. १७ कोटी रुपयांपेक्षा अधिक पैसे तो तर जाहिरातींमधूनच कमावतो.
सचिनची संपत्ती कोहलीपेक्षा अधिक आहे. त्याला क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन खूप काळ लोटला आहे. तरीही तो जाहिरात, गुंतवणूक इत्यादींमधून अधिक उत्पन्न मिळवतो. त्याचे मुंबई आणि बंगळुरू या दोन्ही शहरांमध्ये रेस्टोरेंट आहेत. त्याच्याकडे जवळपास १० लग्झरी गाड्या आहेत. तसेच मुंबईमध्ये असलेल्या त्याच्या घराची किंमत ६० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.
जोकोविचची संपत्ती १७ अरबपेक्षा म्हणजे १७०० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. २०२१मध्ये त्याचे उत्पन्न १५० मिलियन डॉलर म्हणजेच ११९२.४२ कोटी रुपयांएवढे होते. तसेच तो २०११च्या हंगामात सर्वाधिक उत्पन्न मिळवणारा खेळाडू ठरला होता. त्या हंगामात त्याने १२ मिलियर डॉलर (९५ कोटी रुपये) एवढे उत्पन्न कमावले होते. २०२१मध्ये त्याने मोठा करार केला होता, त्यामधून त्याला ८ मिलियन युरो म्हणजेच ६४ कोटी रुपयापेक्षा अधिक रक्कम मिळत होती. २०१७-१८ दरम्यानच्या स्पर्धांमध्ये खेळताना आणि जाहिरातींची रक्कम मिळून १९० कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न मिळवले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रोहित पॅटर्न: तब्बल ११ वर्षांपुर्वीच रोहितने सांगितलं होतं सुर्यकुमारचं भविष्य, पोरगं भविष्यात…
रंगतदार होणाऱ्या वनडे मालिकेत विराटकडून जबराट खेळीची अपेक्षा, नाहीतर…
क्या बात है! उमेश यादव आता ‘या’ संघाकडून दिसणार खेळताना, व्हिसाही मंजूर