पुणे : एसआरपीएफ पुणे, पुणे शहर पोलीस संघांनी ११५व्या अखिल भारतीय आगाखान करंडक हॉकी स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली. महाराष्ट्र हॉकी असोसिएशनच्या वतीने आयोजित ही स्पर्धा पिंपरी चिंचवड येथील मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये सुरू आहे.
सोमवारी झालेल्या पहिल्या लढतीत एसआरपीएफ संघाने सोलापूर संघावर ७-०ने मात केली. ही लढत एकतर्फीच झाली. संपूर्ण लढतीत एसआरपीएफ संघाच्या खेळाडूंनी सोलापूरच्या खेळाडूंना संधीच दिली नाही. यात लढतीच्या तिसºयाच मिनिटाला आशिष चोपडेने निलेश जॉयच्या पासवर गोल करून एसआरपीएफ संघाचे खाते उघडले. तीन मिनिटानंतर निलेश जॉयने ( ६ मि.) मैदानी गोल केला. पुढच्याच मिनिटाला संतोष मोरेने (७ मि.) सचिन जाधवच्या पासवर गोल करून एसआरपीएफ संघाला ३-०ने आघाडी मिळवून दिली. यानंतर शीतल पवारने (१२, २७ मि.) दोन गोल केले, तर निलेश चोपडे (२३ मि.) आणि सचिन जाधव (२५ मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला. निलेश चोपडेने राकेश सहारेच्या पासवर, तर सचिन जाधवने मोहनिश पठाणच्या पासवर गोल केले.
दुसºया लढतीत ए. राजपूतच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर पुणे शहर पोलीस संघाने रत्नागिरी संघावर ५-१ने मात केली. यात राजपूतने ८ व्या, २७व्या आणि २८व्या मिनिटाला गोल केले. विशाल बारामतीकर (१३ मि.) आणि इंदल सूर्यवंशी (२९ मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला. रत्नागिरी संघाकडून एकमेव गोल केतन मंडोरेने (१६ मि.) केला.
तिसºया लढतीत नागपूर अकॅडमीने इंदोर संघावर ४-१ने मात केली. यात लढतीच्या १७व्या मिनिटाला रोहित खनवालने मैदानी गोल करून नागपूर संघाला आघाडी मिळवून दिली. यानंतर २७व्या मिनिटाला फरहान शेखच्या पासवर नदीम शेखने गोल करून नागपूरला २-० अशी आघाडी मिळवून दिली. मध्यन्तराला नागपूर संघाने ही आघाडी कायम राखली होती. उत्तरार्धात लोकेश शर्माने (४२ मि.) गोल करून इंदोरची पिछाडी कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र यानंतर रोहित खनवाल (४३मि.) आणि नदीम शेख (४७मि.) यांनी गोल करून नागपूर संघाला ४-१ असा विजय मिळवून दिला.
महत्त्वाच्या बातम्या:
–हॉकी विश्वचषक २०१८: आघाडी घेतल्यावर फ्रान्सला स्पेन विरुद्ध मानावे लागले बरोबरीत समाधान
–वाढदिवस विशेष: भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राजबद्दल या खास गोष्टी माहिती आहेत का?
–एकाच जागी, एकाच ओव्हरमध्ये ६ षटकार मारणारा १९ वर्षीय युवराज सिंग, पहा व्हिडीओ…