पुणे। पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे व केपीआयटी यांच्या संलग्नतेने 8 व 10 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील तिसऱ्या आयकॉन ग्रुप लिटिल कुमार चॅम्पियनशिप सिरिज 2019 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 11 व 12 मे 2019 रोजी लॉयला हायस्कुल शेजरी (सेंटर फॉर पोलिस रिसर्च) सीपीआर, पाषाण येथे पार पडणार आहे.
स्पर्धेत एकूण 131 हून अधिक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे असे स्पर्धा संचालक अन्वित बेंद्रे यांनी सांगितले. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या करंडक व प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात येणार आहे.