आपणा सर्वांना माहिती आहे की, पुढील महिन्यापासून (१९ सप्टेंबर) आयपीएलच्या १३व्या हंगामाची सुरुवात होणार आहे. ५३ दिवस चालणाऱ्या या हंगामातील अंतिम सामना १० नोव्हेंबरला खेळला जाणार आहे. भारतातील कोरोना व्हायरसची परिस्थिती पाहता, यंदा आयपीएलचे आयजोन भारताबाहेर संयुक्त अरब अमिराती (युएई)मध्ये करण्यात आले आहे. त्यामुळे यापुर्वी युएईमध्ये जास्त सामने न खेळलेल्या खेळाडूंच्या प्रदर्शनावर सर्वांचे लक्ष असेल.
तसं तर, आयपीएलमध्ये वेगवेगळ्या देशातील दिग्गज आणि युवा खेळाडू सहभागी होत असतात. अगदी आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून काही खेळाडू आयपीएलचा भाग आहेत. पण, एखादा खेळाडू गेल्या अनेक वर्षांपासून संघाचा भाग आहे, म्हणून त्याला संघाबाहेर काढू शकत नाही, अशी कोणत्याच संघाची भावना नसते. जो खेळाडू प्रत्येक हंगामात शानदार प्रदर्शन करतो, तोच खेळाडू जास्त वर्षे संघात टिकून राहतो.
आयपीएलमध्ये २ असे भारतीय खेळाडू आहेत, जे पहिल्या हंगामापासून आयपीएलचा भाग आहेत. पण, त्यांच्या वयामुळे किंवा इतर कोणत्या कारणांमुळे हे खेळाडू पुढील हंगामापासून आयपीएलमध्ये खेळताना दिसू शकत नाहीत. त्याच खेळाडूंचा या लेखात आढावा घेण्यात आला आहे.
दोन भारतीय खेळाडू जे पुढील हंगामापासून नसतील आयपीएलचा भाग (2 Indian Players Who Might Playing Their Last Season) –
२. अमित मिश्रा – Amit Mishra
भारतीय संघाचा दिग्गज फिरकीपटू अमित मिश्रा याची आयपीएल कारकिर्द दमदार राहिली आहे. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये १४७ सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने २४.१७च्या सरासरीने १५७ विकेट्स घेतल्या आहेत. हा ३७ वर्षीय गोलंदाज आतापर्यंत आयपीएलच्या दिल्ली कॅपिटल्स, डेक्कन चार्जर्स आणि सनराइजर्स हैद्राबाद संघाचा भाग राहिला आहे. दरम्यान त्याने या तिन्ही वेगवेगळ्या संघांकडून हॅट्रिक घेण्याचा कारनामा केला आहे.
२०१५ साली मिश्राची दिल्ली कॅपिटल्स संघात निवड झाली होती. तेव्हापासून तो दिल्ली संघाकडून शानदार कामगिरी करत आहे. पण गतवर्षी त्याने दिल्लीकडून ११ सामने खेळत केवळ ११ विकेट्स चटकावल्या होत्या. जर, आयपीएलच्या तेराव्या हंगामात त्याचे प्रदर्शन खराब राहिले तर, कदाचित त्याच्यासाठी आयपीएलचा तेरावा हंगाम हा शेवटचा हंगाम ठरु शकतो.
१. हरभजन सिंग – Harbhajan Singh
भारतीय संघाचा दिग्गज गोलंदाज हरभजन सिंग हा आयपीएलमधील प्रतिष्ठित खेळाडूंपैकी एक आहे. २००८ साली हरभजनने मुंबई इंडियन्स संघातून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून तो २०१७पर्यंत मुंबई इंडियन्सचाच भाग होता. मात्र, २०१८मध्ये त्याची चेन्नई सुर किंग्स संघात निवड झाली. तेव्हापासून तो चेन्नईकडून आपले उत्कृष्ट देण्याचा प्रयत्न करत आहे.
हरभजनने आयपीएलमध्ये आतापर्यंत १६० सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने ७.०५च्या इकोनॉमी रेटने १५० विकेट्स आपल्या खात्यात नोंदवल्या आहेत. आयपीएल २०१९मधील त्याच्या प्रदर्शनाविषयी बोलायचे झाले तर, त्याने पूर्ण हंगामात ११ सामने खेळत १६ विकेट्स घेत दमदार प्रदर्शन केले होते. परंतु, चेन्नईचा हा सिंह आता ४० वर्षांचा झाला आहे.
त्यामुळे जर त्याचे या हंगामातील प्रदर्शन खराब राहिले, तर त्याला संघातून बाहेर करुन दूसऱ्या खेळाडूला संधी दिली जाऊ शकते. तर, इतर संघही कदाचित त्याला आपल्या संघात स्थान देऊ शकायचे नाहीत. त्यामुळे हरभजनसाठी हा त्याचा शेवटचा ठरु शकतो.
ट्रेंडिंग लेख –
वाढदिवस विशेष : विराट नसता तर बद्रीनाथ असता
या दोन संघांनी आयपीएलमध्ये बदलले आहेत तब्बल ११ कर्णधार
एका आयपीएल हंगामात तब्बल १००० मिनीटं फलंदाजी करणारा एकमेव फलंदाज
महत्त्वाच्या बातम्या –
वेगवान गोलंदाज दीपक चहराला कोरोनाची लागण? बहिण मालतीने दिली अशी प्रतिक्रिया
राजस्थान रॉयल्सच्या प्रशिक्षकांनी केली कोरोनावर मात; दुबईमध्ये झाले दाखल
भारतीय दिग्गजाने निवडले आरसीबी संघातील ४ परदेशी खेळाडू, म्हणतोय या हंगामात…