भारतीय संघाचा माजी अष्टपैलू युवराज सिंग आज आपला ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा जन्म १२ डिसेंबर १९८१ साली चंदिगड येथे झाला होता. भारतीय क्रिकेटमधील दोन दिग्गज खेळाडू म्हणून एमएस धोनी आणि युवराज सिंग यांना ओळखले जाते. युवराज सिंगने याच वर्षी क्रिकेटला अलविदा केले, तर धोनी विश्वचषक २०१९पासून एकही सामना खेळला नाही.
भारतीय क्रिकेटचा माजी कर्णधार एमएस धोनी हा वनडे सामन्यांत विक्रमांच्या बाबतीत युवराज सिंगपेक्षा बराच पुढे आहे. असे असले तरी असे काही युवराजचे रेकॉर्डस् आहेत जे धोनी कधीही मोडू शकत नाही.
#१ एका षटकात सहा षटकार मारणे
युवराज सिंगने २००७च्या टी२० विश्वचषकात स्टुअर्ट ब्रॉडच्या एकाच षटकात ६ षटकार मारले होते. हा विक्रम आता धोनीला मोडणे जवळजवळ अशक्यच आहे. धोनी हा स्फोटक फलंदाज असला तरी आता वय हा मुद्दा विचारात घेतला तर ही कामगिरी करणे हे कठीण आहे. तसेच त्याला टी२० विश्वचषकात संधी मिळणे सध्यातरी कठीण दिसत आहे. ३५९ षटकारांसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत धोनी पाचवा आहे तर २५१ षटकारांसह युवराज १४वा. तरीही ६ षटकारांचा विक्रम धोनीसाठी कठीणच आहे.
#२ मालिकावीर पुरस्कार
आयसीसीने आयोजित केलेल्या सर्वच स्पर्धांत युवराज सिंगने अतिशय चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याला ५० षटकांच्या विश्वचषकात मालिकावीर हा पुरस्कार मिळाला आहे. तर धोनीला या विश्वचषकात अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्काराने सन्मानित केले होते. परंतु विश्वचषकात मालिकावीर पुरस्कार धोनीसाठी कठीण आहे. कारण अशी कामगिरी करण्यासाठी धोनीला कमीतकमी २०२१ विश्वचषकापर्यंत तरी क्रिकेट खेळावे लागेल. ते सध्यातरी केवळ अशक्य आहे.
#३ आशिया खंडाच्या बाहेर शतकी खेळी
धोनीने वनडे कारकिर्दीत १० शतके केली आहेत परंतु यातील एकही शतक हे आशिया खंडाच्या बाहेर नाही. तर युवराज सिंगच्या नावावर आशियाबाहेर वनडेतील ३ शतकी खेळी आहेत.
#४ आयसीसी आयोजित स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळणे
युवराज सिंग आणि धोनी या दोघांची वय ही सारखीच असली तरी युवराज हा आयसीसी आयोजित स्पर्धेच्या अंतिम फेरीत एक समान जास्त खेळला आहे. २००२ साली कारकिर्दीला प्रारंभ केलेल्या युवराजने आयसीसी आयोजित स्पर्धेच्या अंतिम फेरीचे सहा सामने खेळले आहे. त्यात २००२ चॅम्पियन्स ट्रॉफी, २००३ विश्वचषक, २००७ टी२० विश्वचषक, २०११ विश्वचषक, २०१४ टी२० विश्वचषक, आणि २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफी अशा या अंतिम फेरी आहेत. तर धोनीने २००७ टी२० विश्वचषक, २०११ विश्वचषक, २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी २०१४ टी२० विश्वचषक, २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफी असे ५ अंतिम सामने खेळले आहेत.
#५ वेगवान अर्धशतक
कोणत्याही प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात वेगवान अर्धशतक करण्याचा विश्वविक्रम हा सध्या युवराजच्या नावावर आहे. १२ चेंडूत त्याने हे अर्धशतक इंग्लंडच्या विरुद्ध २००७च्या विश्वचषकात केले होते. हा विश्वविक्रम सध्या तरी दुसऱ्या कोणत्याही खेळाडूंकडून मोडणे अवघड दिसत आहे.
गोष्ट एका क्रिकेटरची लेखमालेतील वाचनीय लेख-
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १२: कारखान्यात काम करायला झाम्बियाला निघालेला मुनाफ पटेल
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ११: लांब केसांमुळे संघात प्रवेश नाकारलेला मुरली विजय
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १०: भारताचा भन्नाट क्षेत्ररक्षक मोहम्मद कैफ
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ९: म्हैसुर एक्सप्रेस जवागल श्रीनाथ
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ८: मिस्टर आयपीएल सुरेश रैना
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ७: अहमदनगरचा मराठमोळा झहीर खान
– गोष्ट एका क्रिकेटरची भाग ६: व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ५: मोठ्या भावाच्या जागी स्थान मिळालेला तो पुढे सर्वांचा दादा झाला
–एका क्रिकेटटरची गोष्ट भाग ४: ट्रक ड्राईव्हर बनण्यासाठी कॅनडाला निघालेला हरभजन सिंग
-गोष्ट एका क्रिकेटरची भाग ३: त्रिशतकाची भविष्यवाणी पदार्पणाआधीच करणारा विरेंद्र सेहवाग!
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग २: ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान संघाशी वैर घेणारा इरफान पठाण