मुंबई । ‘बाईक’चा शौकीन असलेला भारताचा यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनीने नुकतेच आठ लाख रुपयांमध्ये महिंद्रा स्वराज ट्रॅक्टर विकत घेतले होते. त्यानंतर ट्रॅक्टर चालवत असताना महेंद्रसिंग धोनीचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर साऱ्यांनाच आश्चर्यचकित वाटले.
धोनीच्या ट्रॅक्टर खरेदीनंतर निर्णयावर आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर लिहिले की, “मला नेहमी वाटते हा माणूस नेहमी विचार करून योग्य तो निर्णय घेतो. लॉकडाऊन असतानाच धोनीने महिंद्रा स्वराज्य 963 एफई हे ट्रॅक्टर खरेदी केले होते.
I’ve always thought the man is a good decision-maker with the perfect sense of judgment..
😊 https://t.co/XP5AUSyCr1— anand mahindra (@anandmahindra) June 6, 2020
प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार, एमएस धोनी भविष्यात शेती करण्याच्या विचारात आहे. यासाठी त्याने ट्रॅक्टर खरेदी केले आहे. रांची येथे सात एकर परिसरात फार्म हाऊस आहे. जेथे त्याने एक मोठे घर बांधले असून बाईक, कार ठेवण्यासाठी स्वतंत्र पार्क बनवले आहे. यासोबतच उरलेल्या जागेवर तो शेती करणार असल्याची माहिती पुढे येत आहे.
मागील वर्ष धोनीने भारतीय सैन्यदलातील वीस वर्षांपूर्वीची जुनी गाडी जोंगा खरेदी केली होती. 1999 नंतर जोंगा गाड्या बंद केल्या आहेत. भारतीय सैन्य दलाने ही गाडी खरेदी करणे बंद केले आहे. त्याऐवजी दुसरी गाडी खरेदी करण्यास पसंती दिली आहे. पण आजही या गाडीला दुसरी गाडी टक्कर देऊ शकत नाही. म्हणून धोनीने हे गाडी खरेदी केली आहे. मागील वर्षी धोनीने टीम बस देखील चालवली होती.
2018 साली पहिल्यांदा धोनी चेन्नईमध्ये ट्रॅक्टर चालवताना दिसून आला होता. इतकेच नव्हे तर धोनीने आपल्या संघाची बसदेखील चालवलेली आहे. व्हीव्हीएस लक्ष्मण याने त्याच्या आत्मकथेमध्ये याचा खुलासा केला होता. कर्णधार म्हणून खेळताना पहिल्याच सामन्यात धोनी नागपूर येथे संघाची बस चालवताना दिसून आला. सामना संपल्यानंतर स्टेडियमपासून हॉटेलपर्यंत बस चालवली होती.