भारतीय संघाचा आणि आयपीएल फ्रँचाइझी मुंबई इंडियन्सचा स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्या एक महिन्यापूर्वी वडील झाला होता. त्याची पार्टनर बॉलिवूड अभिनेत्री नताशा स्टॅनकोविच हिने एका मुलाला जन्म दिला. त्यांनी आपल्या मुलाचे नाव अगस्त्य असे ठेवले आहे. मुलाच्या जन्मापासूनच स्टार जोडप्याने सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करणे सुरूच ठेवले आहे.
त्याचे चाहतेदेखील त्याच्या फोटो-व्हिडिओंवर बारीक नजर ठेवतात. आता, आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर मुलाबरोबर एक फोटो शेअर करताना नताशाने सांगितले आहे की त्यांचा मुलगा पूर्ण एक महिन्याचा झाला आहे.
तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करताना नताशाने लिहिले की, “अगस्त्य आता एक महिन्याचा झाला आहे … आम्ही तुझ्यावर मनापासून प्रेम करतो हार्दिक”. हा फोटोवर तिने पती हार्दिक पंड्यालाही टॅग केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तसेच फॅन्स त्यांना त्यासाठी खूप अभिनंदन करणारे मेसेज पाठवत आहेत.
https://www.instagram.com/p/CEhJSjqAaAU/
हार्दिक सध्या आपला संघ मुंबई इंडियन्ससह युएईमध्ये आहे. कोरोना विषाणूच्या धोक्यामुळे नताशा त्याच्यासह तेथे गेलेली नाही. आयपीएलच्या १३ व्या सत्रात सर्व फ्रॅन्चायझी युएईला पोहोचल्या आहेत. सध्या काही संघांचे खेळाडूंना क्वॉरनटाईन ठेवण्यात आले आहे तर काही संघांनी सरावही सुरू केला आहे.
हार्दिक पंड्याबद्दल सांगायचे तर त्याने आयपीएलच्या ६६ सामन्यांमध्ये २८.८६ च्या सरासरीने १०६८ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने ९.०६ च्या इकॉनॉमीने ४२ बळीही घेतले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
दुबईमध्ये हातात बॅट घेताच विराट कोहली घाबरला; जाणून घ्या काय होते कारण
श्रेयस अय्यरने सांगितले हे काम केल्यावर दिल्ली कॅपिटलची टीम होणार चॅम्पियन
‘ही’ गोष्ट घडली नसती तर एमएस धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला नसता
ट्रेंडिंग लेख –
वाढदिवस विशेष- भारताचा दिग्गज गोलंदाज जवागल श्रीनाथबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी
गोष्ट एका क्रिकेटरची भाग ९: म्हैसुर एक्सप्रेस जवागल श्रीनाथ
सुरैश रैनाऐवजी यंदा हे ३ खेळाडू बनू शकतात चेन्नई सुपर किंग्सचे उपकर्णधार






