सुप्रसिद्ध सिनेअभिनेता शाहरुख खान हा किती मोठा क्रिकेटप्रेमी आहे, हे सर्वजण जाणतात. शाहरुखने २००८ मध्ये सुरू झालेल्या आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघ विकत घेतला होता. त्यानंतर, कॅरेबियन प्रीमियर लीगमधील त्रिनिदाद आणि टोबॅगो संघाची मालकी घेत, त्याने त्या संघाचे नामकरण त्रिनबॅगो नाईट रायडर्स असे केले. हे दोन्ही संघ आपापल्या लीगमध्ये यशस्वी होत असताना, आता शाहरुखने तिसरा व्यावसायिक टी२० संघ विकत घेतला आहे. हा संघ २०२२ साली अमेरिकेतील टी२० लीगमध्ये खेळेल.
अमेरिकेतील टी२० संघाची फ्रॅंचायजी घेतली विकत
भारतातील एका प्रमुख वृत्तपत्राच्या हवाल्याने सांगण्यात येत आहे की, ‘शाहरुख खानने कोलकता नाईट रायडर्स व त्रिनबॅगो नाईट रायडर्स यांच्यापाठोपाठ अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथील संघाची फ्रॅंचायजी मिळवली आहे. या संघाचे नाव लॉस एंजेलिस नाईट रायडर्स असेल.’
आयपीएलच्या धर्तीवर खेळवली जाईल स्पर्धा
भारतात खेळल्या जाणारा इंडियन प्रीमियर लीगच्या धर्तीवर अमेरिकेत लवकरच युएस टी२० लीग आयोजित करण्यात येणार आहे. या लीगमध्ये सहा संघांचा समावेश असेल. सॅन फ्रान्सिस्को, लॉस एंजेलिस, डेलास, शिकागो, वॉशिंग्टन डीसी व न्यूयॉर्क हे संघ खेळताना दिसतील. ही लीग २०२२ मध्ये सुरु होऊ शकते.
नाईट रायडर्स हे नाव जागतिक पातळीवर पोहोचवायचे होते
एका मुलाखतीत बोलताना शाहरुख म्हणाला, “गेल्या काही दिवसांपासून ‘नाईट रायडर्स’ हे नाव जागतिक पातळीवर नेण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो. त्याच अनुषंगाने आमचे अमेरिकेतील टी२० लीगच्या आयोजकांशी बोलणे झाले होते. जगात कोठेही मोठी क्रिकेट लीग होणार असेल, तर त्या ठिकाणी गुंतवणूक करण्यास आम्ही तयार आहोत”
नाईट रायडर्स फ्रॅंचाईजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वेंकी म्हैसूर म्हणाले, “अमेरिका ही जगातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. येथे आम्हाला वेगळी संधी मिळेल. अमेरिकेत क्रिकेटचा प्रसार करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. येथे असे काही ब्रॅंड आहेत, जे क्रिकेटचा प्रचार करतील.”
शाहरुख मालक असलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने २०१२ व २०१४ मध्ये आयपीएल विजेतेपद पटकावले होते. तसेच, त्रिनबॅगो नाईट रायडर्स हा सीपीएलमधील सर्वात यशस्वी संघ आहे. या संघाने चार वेळा स्पर्धेचे जेतेपद आपल्या नावे केले आहे. शाहरुख खानने दक्षिण आफ्रिकेतील ग्लोबल टी२० मध्ये देखील केपटाऊन फ्रॅंचाईजी विकत घेतली होती. मात्र, काही अपरिहार्य कारणाने ही स्पर्धा रद्द करण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या-
‘…म्हणून भारताकडे कामचलाऊ गोलंदाजांची कमतरता’, माजी यष्टीरक्षक फलंदाजाने सांगितली समस्या
पती असावा तर असा! विराटने पत्नी अनुष्काला शिकवले ‘शीर्षासन’
धक्कादायक! पाकिस्तानचा सातवा खेळाडू ‘कोरोना पॉझिटिव्ह’, दौरा रद्द होण्याचे संकट
ट्रेंडिंग लेख-
नादच खुळा! ऑस्ट्रेलिया दौर्यात एकाच टी२० मालिकेत सर्वात जास्त विकेट्स घेणारे ३ भारतीय शिलेदार
भारताविरुद्ध वनडेत सलग ३ शतके झळकविणारे फलंदाज, पाकिस्तानच्या २ खेळाडूंचाही समावेश
भारतीय गोलंदाजांना रडकुंडीला आणत सर्वाधिक शतके ठोकणारे ३ धडाकेबाज फलंदाज