टी-२० क्रिकेटचा शोध लागला तेव्हापासून फलंदाजांनी वनडे आणि कसोटी सामन्यांमध्येही आक्रमक खेळ सुरू केला आहे. प्रत्येक फलंदाजाची अशी इच्छा असते की, त्याने गोलंदाजांवर जबरदस्त प्रहार करावा आणि लवकरात लवकर धावा करून संघाला विजयी करावे. यासाठी तो एका षटकात कमीतकमी एक चौकार किंवा षटकार लावण्याचा प्रयत्न करतो. वनडे क्रिकेटमध्ये हे बर्याचदा पाहायला मिळते.
फलंदाजांच्या अशाच फलंदाजीच्या शैलीमुळे वनडे क्रिकेटमध्ये ४०० हून अधिक धावा फलकावर लागलेल्याही पहायला मिळाल्या आहेत. अशावेळी एखाद्या संघाने भरपूर चौकार-षटकार लगावले आहेत.
या लेखामध्ये तुम्हाला अशा २ संघांबद्दल सांगू ज्यांनी वनडे सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला आहे.
वनडेमध्ये एका डावात सर्वाधिक षटकार ठोकणारे २ संघ
२.वेस्ट इंडिज संघ – २३ षटकार – वि. इंग्लंड, २०१९
या यादीत वेस्ट इंडिजचा संघ तिसर्या क्रमांकावर आहे. वेस्ट इंडिजने २० फेब्रुवारी २०१९ मध्ये ब्रिजटाऊन येथील इंग्लंडविरुद्धच्या वनडे सामन्यात २३ षटकार ठोकले होते. ख्रिस गेलने १३५ धावांची जबरदस्त खेळी केली होती आणि त्याने एकट्यानेच १२ षटकार ठोकले होते. या खेळीमुळे, वेस्ट इंडिज संघाने ८ गड्यांच्या मोबदल्यात ३६० धावा केल्या होत्या.
परंतु, एवढी मोठी धावसंख्या उभारूनही त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. इंग्लंडने जो रूट आणि जेसन रॉय या दोघांच्या शतकांमुळे ४९ व्या षटकात हे लक्ष्य गाठले आणि विजय मिळवला.
१. इंग्लंड संघ – २५ षटकार – वि. अफगाणिस्तान, २०१९ आणि २४ षटकार – वि. वेस्ट इंडीज, २०१९
वनडे क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या संघांपैकी पहिल्या २ क्रमांकावर इंग्लंड संघ आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये वेस्ट इंडीजविरुद्धच्या वनडे सामन्यात त्यांनी ६ गडी गमावून ४१८ धावा केल्या होत्या. या डावात इंग्लिश संघाने २४ षटकार ठोकले होते.
यानंतर इंग्लंडने वनडे विश्वचषक २०१९ मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला. या सामन्यात इंग्लंडने एकूण २५ षटकार ठोकले. इंग्लंडचा कर्णधार ओएन मॉर्गनने एकट्याने यावेळी १७ षटकार मारले होते आणि अवघ्या ७१ चेंडूत या १७ षटकारांसह १४८ धावा केल्या होत्या. त्या खेळीमुळे यजमानांनी ६ गाड्यांच्या मोबदल्यात ३९७ धावा केल्या. हा सामना इंग्लंड संघाने १५० धावांनी जिंकला होता.
ट्रेंडिंग लेख –
भारताच्या स्वातंत्र्यदिनी जन्मलेले ३ भारतीय क्रिकेटपटू
कोण होणार कॅरेबियन प्रिमियर लीग २०२० चा किंग?
१५ ऑगस्ट दिवशी भारताने खेळलेल्या कसोटी सामन्यांचा लागला हा निकाल
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलचे प्रायोजक होण्यासाठी आणखी दोन कंपन्यांनी दाखवला इंटरेस्ट
आयपीएल टीमला आलं टेन्शन, या कारणाने ऑस्ट्रेलिया इंग्लंडचे खेळाडू नाही खेळणार पहिल्या आठवड्यात
‘कॅप्टन कूल’ धोनीचा स्वॅग पाहिलाय का?, आलिशान गाडीतून पोहोचला एअरपोर्टवर