जागतिक क्रिकेटमध्ये अनेक पिता-पुत्रांच्या जोड्या अशा आहेत, ज्यांनी क्रिकेटमध्ये आपलं नाव अजरामर केले. ख्रिस ब्राॅड- स्टुअर्ट ब्राॅड, वॉल्टर हॅडली- रिचर्ड्स हॅडली, लान्स क्रेन्स- ख्रिस केन्स, जेफ मॉर्श- मिचेल माॅर्श, शेन माॅर्श, विजय मांजरेकर- संजय मांजरेकर किंवा लाला अमरनाथ- मोहिंदर अमरनाथ, सुरिंदर अमरनाथ अशा पिता पुत्रांच्या जोड्या क्रिकेटमध्ये बऱ्यापैकी हीट झाल्या.
परंतु काही जोड्या अशा आहेत ज्यात पिता अतिशय महान क्रिकेटपटू ठरला तर पुत्राला मात्र तसा कारनामा करता आला नाही. यातील काही जोड्यांचा या लेखात आपण आढावा घेणार आहोत. 3 sons of great cricketers who didn’t live up to expectations.
३. सुनिल गावसकर- रोहन गावसकर
कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदा १० हजार धावा करणारे लिटील मास्टर सुनिल गावसकर हे भारताकडून १९७१ ते १९८७ या काळात तब्बल १२५ कसोटी सामने खेळले. यात त्यांनी ५१.१२च्या सरासरीने १०१२२ धावा केल्या. वनडेतही त्यांनी १०८ सामन्यात ३५.१३च्या सरासरीने ३०९२ धावा केल्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये गावसकर एकूण ३४८ सामने खेळले. त्यात त्यांनी २५८३४ धावा केल्या. त्यांचा मुलगा रोहनचा जन्म २० फेब्रुवारी १९७६ रोजी झाला. गावसकर त्यावेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत होते.
रोहनने भारताकडून एकूण ११ वनडे सामने खेळले. २००४मध्ये खेळलेल्या या ११ सामन्यात १८.८७च्या सरासरीने जेमतेम १५१ धावा व १ विकेट घेतली. रोहनला मुंबईकडून क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नाही. यावरुन त्यावेळच्या मुंबई संघातील स्पर्धा लक्षात येते. रोहन तब्बल ११७ प्रथम श्रेणी सामने बंगाल संघाकडून खेळला. त्यात त्याने ४४.१९च्या सरासरीने ६९३८ धावा केल्या. सुनिल गावसकरांचे सध्या वय ७० वर्ष २६७ दिवस असून रोहनचे वय ४४ वर्ष आहे.
२. राॅजर बिन्नी- स्टुअर्ट बिन्नी
भारतीय क्रिकेट संघात राॅजर बिन्नी यांचे वेगळेच स्थान होते. १९८३ विश्वचषक विजयातील ते एक शिल्पकार होते. संपुर्ण स्पर्धेत त्यांनी १८ विकेट्स घेतल्या होत्या. १९८५ वर्ल्ड सिरीज चॅंपियनशीप स्पर्धेत त्यांनी १७ विकेट्स घेतल्या होत्या. भारताकडून बिन्नी १९७९ ते १९८७ या काळात क्रिकेट खेळले. २७ कसोटी सामन्यात त्यांनी २३.०५च्या सरासरीने ८३० धावा तर ३२.६३च्या सरासरीने ४७ विकेट्स घेतल्या. वनडेत ७२ सामने खेळताना त्यांनी ६२९ धावा व ७७ विकेट्स घेतल्या. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर त्यांनी निवड समितीतही काम केले.
भारताकडून वनडे डावात सर्वोत्तम कामगिरी करण्याचा विक्रम राॅजर बिन्नी यांचा मुलगा स्टुअर्ट बिन्नीच्या नावावर आहे. स्टुअर्टने ४ धावा देत ६ विकेट्स घेतल्या होत्या. त्याला भारताकडून ६ कसोटी व १४ वनडे सामने खेळण्याची संधी मिळाली. परंतु त्याला स्वत:ला सिद्ध करता आले नाही.
३६ वर्षीय स्टुअर्ट बिन्नी २०१६मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला असून २०२० हंगामात तो नागालॅंड संघाकडून रणजी सामने खेळला आहे. राॅजर बिन्नी यांचे सध्याचे वय ६५ वर्ष आहे.
१. सर व्हिव्हियन रिचर्ड्स- माली रिचर्ड्स
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महान खेळाडू म्हणून सर व्हिव्हियन रिचर्ड्स यांच्याकडे पाहिले जाते. व्हिव रिचर्ड्स यांनी १९७५, १९७९, १९८३ व १९८७ असे चार विश्वचषक खेळले. यात वेस्ट इंडिजने १९७५ व १९७९साली विजय मिळवला तर १९८३साली ते भारताविरुद्ध खेळताना उपविजेते ठरले. त्यांची विश्वचषकातील सरासरी ही ६३.३१ अशी व स्ट्राईक रेट ८५.०५ असा राहिला. रिचर्ड्स सोडून जगात कोणत्याही फलंजादाला विश्वचषकात ६०च्या सरासरीने १ हजार धावा करता आल्या नाहीत. रिचर्ड्स यांनी २३ सामन्यात ३ शतके व ५ अर्धशतकांच्या मदतीने १०१३ धावा केल्या.
त्यांनी वनडेत १८७ सामन्यात ४७च्या सरासरीने ६७२१ तर कसोटीत १२१ सामन्यात ५०.२३च्या सरासरीने ८५४० धावा केल्या आहेत. त्यांचे सध्याचे वय ६८ वर्ष आहे.
त्यांच्या मुलाला मात्र अशी मोठा कामगिरी करता आली नाही. माली अलेक्झांडर रिचर्ड्सचा जन्म टौंटन, सोमरसेट येथे १९८३ला झाला. त्याने इंग्लंडमध्ये विद्यापीठ स्तरावरील क्रिकेट खेळले व मिडलसेक्सकडून कांऊटी क्रिकेटही खेळले.
तो अॅंटिंगा व बार्बुडाकडून प्रथम श्रेणी सामने खेळला परंतु त्याला विशेष चमक दाखवता आली नाही. त्याने १८ प्रथम श्रेणी सामन्यात ३७६ धावा व १५ विकेट्स घेतल्या तर ६ अ दर्जाच्या सामन्यात ३६ धावा व १ विकेट घेतली. त्याच्या याच कामगिरीमुळे त्याला कधीही वेस्ट इंडिज संघाकडून क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नाही. मालीचे सध्याचे वय ३७ वर्ष आहे.
गोष्ट एका क्रिकेटरची लेखमालेतील वाचनीय लेख-
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १९: पाकिस्तानला नेहमीच घाम फोडणारा वेंकटेश प्रसाद
–गोष्ट एका क्रिकेटची भाग १८: एकेकाळचा बाॅम्बे डक ते भारताचा प्रमुख गोलंदाज अजित अगरकर
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १७: धोनी आधी पदार्पण करुनही १४ वर्षांचा वनवास पाहिलेला दिनेश कार्तिक
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १६: राजेशाही घराण्यातूनच क्रिकेटचा वारसा घेऊन आलेला अजय जडेजा
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १५: शंभर कसोटी सामन्यांच्या उंबरठ्यावर असणारा इशांत शर्मा
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १४: भारताचा जंबो गोलंदाज अनिल कुंबळे
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १३: तब्बल १८ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा आशिष नेहरा
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १२: कारखान्यात काम करायला झाम्बियाला निघालेला मुनाफ पटेल
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ११: लांब केसांमुळे संघात प्रवेश नाकारलेला मुरली विजय
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १०: भारताचा भन्नाट क्षेत्ररक्षक मोहम्मद कैफ
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ९: म्हैसुर एक्सप्रेस जवागल श्रीनाथ
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ८: मिस्टर आयपीएल सुरेश रैना
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ७: अहमदनगरचा मराठमोळा झहीर खान
– गोष्ट एका क्रिकेटरची भाग ६: व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ५: मोठ्या भावाच्या जागी स्थान मिळालेला तो पुढे सर्वांचा दादा झाला
–एका क्रिकेटटरची गोष्ट भाग ४: ट्रक ड्राईव्हर बनण्यासाठी कॅनडाला निघालेला हरभजन सिंग
-गोष्ट एका क्रिकेटरची भाग ३: त्रिशतकाची भविष्यवाणी पदार्पणाआधीच करणारा विरेंद्र सेहवाग!
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग २: ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान संघाशी वैर घेणारा इरफान पठाण