भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना लाॅर्ड्सच्या ऐतिहासीक मैदानावर खेळला जात आहे. सामन्याच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी (१६ ऑगस्ट) रिषभ पंतवर भारतीय संघाच्या आशा टिकून आहेत. दरम्यान कमी सुर्यप्रकाशामुळे चौथ्या दिवसाचा खेळ वेळेच्या आधीच थांबवण्यात आला. इंग्लंडचा कर्णधार जो रूट या निर्णयामुळे नाराज दिसून आला. सामना वेळेआधी थांबवल्यामुळे रूटने त्याचा राग व्यक्त करत पंतसोबत वाद घातला. त्यांच्यातील वादाचे फोटो समाजमाध्यमांवर खुप व्हायरल होत आहे.
चाहत्यांनी हे फोटो शेयर करत मजेदार कमेंट्सही केल्या आहेत. त्याआधी कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा कमी सुर्यप्रकाशात फलंदाजी केल्यामुळे पंतवर नाराज दिसत होते. या दोघांनी पंतला पंचांना ही गोष्ट लक्षात आणून देण्यास सांगितले होते.
समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या फोटोत जो रूटच्या चेहऱ्यावरची नाराजी स्पष्टपणे दिसत आहे. फोटोत दिसत आहे की, तो रागात पंतसोबत काहीतरी बोलत आहे. यावर पंतही रूटला उत्तर देताना दिसत आहे.
Chal chal.. tera jitna weight hai na.. utna to Rohit bhai vada pav kha lete hain breakfast mein.. pic.twitter.com/SrfoBZp10a
— Keh Ke Peheno (@coolfunnytshirt) August 15, 2021
Average road rage scenes in Delhi with Rishabh Pant being a "jaat boy" here. pic.twitter.com/9qFa9BiEkD
— V (@imvrb__09) August 15, 2021
Pant and Root discussing US withdrawal from Afghanistan pic.twitter.com/qsW1Sesr8K
— Expert on Everything Joshi (@SamyukthaJoshi) August 15, 2021
Root: bro… London city is the best in the world.
Pant: ah chal.. chal.., Dilli banegi London. pic.twitter.com/YLNlEYslCt— ಪ್ರಕಾಶ್ (@Royalprakash) August 15, 2021
सामन्यातील चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने त्यांच्या दुसऱ्या डावात ६ विकेट गमावत १८१ धावा केल्या आहेत. पंतसोबत इशांत शर्मा ४ धावांसह फलंदाजी करत आहे. इंग्लंड संघावर भारताने १५४ धावांची आघाडी घेतली आहे. सामन्याच्या अंतिम दिवशी विरोधी संघावर किमान २०० धावांची आघाडी घेण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. तसेच इंग्लंड भारतीय संघाला लवकरात लवकर गुंडाळण्याचा प्रयत्न करेल.
महत्त्वाच्या बातम्या-
अन् दर्शकांना झाले अतिआनंदी, जणू पुजाराने शतक केल्यासारख्या वाजवल्या टाळ्या; पाहा नेमकं काय घडलं?
रोमहर्षक कसोटीत वेस्ट इंडिजची १ विकेटने बाजी, गोलंदाजांच्या अभेद्य भागिदारीने पाकिस्तान चितपट
संघ कठीण परिस्थितीत असूनही रिषभ दिसत होता निवांत; नेटकरी म्हणाले, ‘हेच त्याच्या यशाचं गुपित’