भारत आणि न्यूझीलंड यांच्यात गुरुवारी (२५ नोव्हेंबर) कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळायला सुरुवात झाली. हा सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यासाठी दोन भारतीय पंच नितिन मेनन आणि आणि विरेंद्र शर्मा यांच्यावर योग्य निर्णय देण्याची जबाबदारी आहे. मात्र, न्यूझीलंडच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावादरम्यान पंचांद्वारे निराशाजनक निर्णय दिले गेले. सामन्यादरम्यान आतापर्यंत पंचांकडून ६ वेळा चुकीचे निर्णय दिले गेले. यापैकी न्यूझीलंड संघाचा सलामीवीर टॉम लॅथम फलंदाजी करत असताना तीन वेळा विकेट गमावण्यापासून वाचला.
भारतीय पंचांद्वारे दिले गेलेले हे निर्णय सामन्याची दिशा बदलू शकणारे होते, पण सहा वेळा हे निर्णय बदलले गेले. न्यूझीलंडचा सलामीवीर लॅथमने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ५० धावा केल्या आणि दुसऱ्या दिवसाखेर खेळपट्टीवर कायम आहे. यामध्ये त्याने १६४ चेंडूंचा सामना केला आणि चार चौकार देखील ठोकले. न्यूझीलंड संघाचा दुसरा सालामीवीर फलंदाज विल यंगने १८० चेंडूंचा सामना केला आणि यामध्ये ७५ धावा केल्या. दुसऱ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंडची धावसंख्या एकही विकेट न गमावत १२९ धावा अशी होती. भारतीय संघ अजून २१६ धावांनी आघाडीवर आहे.
यापूर्वी भारतीय पंच नितिन मेनन आणि अनिल चौधरी यांचे इंग्लंड विरुद्ध खेळल्या गेलेल्या मायदेशातील मालिकेत उत्कृष्ट निर्णय दिल्यामुळे अनेकांनी कौतुक केले होते. न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत अनिल चौथरी टीव्ही/तिसरे पंच आहेत. या जोडीने न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात अद्याप समाधानकारक भूमिका बजावलेली नाही.
याबाबत भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने निराशा व्याक्त केली आहे. त्याने त्याच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून एक पोस्ट करत लिहिले की, “या कसोटी सामन्यात आतापर्यंत पंचांचे कार्य खूपच सामान्य राहीले आहे.’
Umpiring has been fairly ordinary in this Test thus far. #IndvNZ
— Aakash Chopra (@cricketaakash) November 26, 2021
त्याव्यतिरिक्त क्रिकेट तज्ञांनी देखील याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. टॉम लॅथमला दुसऱ्या दिवशी भारतीय पंचांद्वारे तीन वेळा बाद करार दिला गेला आणि तिन्ही निर्णय डीआरएसमध्ये चुकीचे ठरले.
महत्त्वाच्या बातम्या –
South Africa A vs India A: पहिल्या कसोटी पावसामुळे अनिर्णित; इश्वरनचे शानदार शतक, तर ९६ धावा
“टीम पेन संघात हवा कारण, तो जगातील सर्वोत्तम यष्टिरक्षक आहे”
क्रिकेटमध्ये ७ वर्षांपूर्वी घडली होती ‘ती’ वाईट घटना, ज्यामुळे हेलावले होते संपूर्ण क्रिकेटजगत