टी20 विश्वचषक 2022(T20 World Cup)साठी भारताची जोरदार तयारी सुरू होती, मात्र मध्येच जसप्रीत बुमराह याच्या दुखापतीने त्यावर थोडाफार अंकुश लावला. बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेतून बाहेर झाला. या स्टार गोलंदाजामुळे भारताची बॉलिंग अटॅक निरस होताना दिसली आहे. जर तो टी20 विश्वचषकात खेळला नाहीतर मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी याला संधी दिली जाऊ शकते.
भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) टी20 विश्वचषकात खेळणार की नाही हे निश्चित नाही, मात्र त्याच्याजागी मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी संघात घेतले आहे. मोहम्मद शमी (Mohammad Shami) टी20 विश्वचषकासाठी राखीव खेळाडू म्हणून संघात आहे, मात्र प्रश्न हा आहे की हे दोघे विश्वचषकासाठी कितपत तयार आहेत. त्यांच्या या तयारीबाबतच भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफर याने एक मजेशीर ट्वीट केले आहे.
या ट्वीटमध्ये जाफरने सिराज आणि शमी कशाप्रकारे टी20 विश्वचषकाची तयारी करत आहे, असे लिहिले असून त्याच्यासोबत एक मीमही शेयर केले आहे.
Shami & Siraj trying to get WC ready in short time #T20WorldCup2022 #INDvSA pic.twitter.com/8hJsmSZ9dQ
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) October 2, 2022
शमीने 2021च्या टी20 विश्वचषकानंतर भारताकडून एकही टी20 सामना खेळलेला नाही. दुसरीकडे सिराजने देखील फेब्रुवारीनंतर एकही आंतरराष्ट्रीय टी20 सामना खेळलेला नाही. यामुळे या दोघांनाही टी20 विश्वचषकाच्या मुख्य संघात घेतले तर त्यांच्याकडे सरावासाठी फारच कमी वेळ शिल्लक आहे.
शमीला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी20 मालिकेसाठी संघात घेतले होते, मात्र तो कोरोनाच्या विळख्यात आल्याने त्याला त्या मालिकेला मुकावे लागले. तसेच तो सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठीही संघाचा भाग नाही. तसेच त्याने मागील वर्षी झालेल्या टी20 विश्वचषकाच्या 5 सामन्यांत 6 विकेट्स घेतल्या होत्या.
सिराजने भारताकडून केवळ 5 टी20 सामने खेळताना 5 विकेट्स घेतल्या आहेत, तर शमीने देखील 17 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांत 18 विकेट्स घेतल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
तिसऱ्या पंच्यांच्या निर्णयामुळे युवराज सिंग नाराज, पूजा वस्त्राकरला गमवावी लागली विकेट
‘टी20 वर्ल्डकपमध्ये हार्दिक-स्टोक्स ठरतील प्रभावशाली,’ आफ्रिकन ऑलराउंडरचे मोठे भाष्य
INDvSA: किंग कोहलीच्या खास यादीत समाविष्ट होण्याची सूर्याला संधी! केवळ एवढ्याच धावांची आवश्यकता