आयसीसीनं श्रीलंकेचा डावखुरा फिरकी गोलंदाज प्रवीण जयविक्रमा याच्यावर भ्रष्टाचारविरोधी नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी एका वर्षाची बंदी घातली आहे. या काळात तो 6 महिन्यांसाठी निलंबित राहणार आहे.
जयविक्रमानं आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी नियमांचं उल्लंघन केल्याची कबुली दिल्यानंतर त्याच्यावर ही बंदी घालण्यात आली. जयविक्रमानं आयसीसी नियमांच्या अनुच्छेद 2.4.7 चं उल्लंघन केल्याचं मान्य केलं. जयविक्रमावरील आरोप आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि लंका प्रीमियर लीगशी संबंधित आहेत.
ACU द्वारे केल्या जात असलेल्या कोणत्याही तपासात अडथळा आणणे किंवा विलंब करणे, तपासाशी संबंधीत कोणतीही माहिती लपवणे किवा नष्ट करणे, तपासाशी संबंधित कागदपत्रांशी छेडछाड करणे, इत्यादी आरोप त्याच्यावर आहेत. आयसीसीनं श्रीलंका क्रिकेट बोर्डासोबत केलेल्या करारातील भ्रष्टाचार विरोधी नियमांच्या कलम 1.7.4.1 आणि 1.8.1 नुसार ही कारवाई केली.
प्रवीण जयविक्रमा श्रीलंकेसाठी 2022 मध्ये शेवटचा सामना खेळला होता. त्यानं आतापर्यंत 5 कसोटी, 5 एकदिवसीय आणि तितकेच टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या 15 सामन्यांमध्ये त्यानं एकूण 32 विकेट घेतल्या. जयविक्रमानं 2021 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या मालिकेत श्रीलंकेसाठी पदार्पण केलं होतं. त्यानं 2021 मध्ये पल्लेकेले येथे बांगलादेशविरुद्धच्या पदार्पणाच्या कसोटीत 11 बळी घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केलं होतं. कसोटी पदार्पण करणाऱ्या खेळाडूसाठी ही विक्रमी कामगिरी होती.
कालांतरानं प्रवीण जयविक्रमा आपला फॉर्म कायम राखू शकला नाही. त्यानं केवळ पाच कसोटी सामने खेळले. प्रवीण 2021 आणि 2022 लंका प्रीमियर लीगमध्ये जाफना किंग्ससाठी आणि 2023 मध्ये डंबुला सिक्सर्ससाठी खेळला होता.
हेही वाचा –
ऋतुराज गायकवाडची फ्लॉप कामगिरी सुरूच, पदार्पण करणाऱ्या गोलंदाजाने दाखवला पॅव्हेलियनचा रस्ता
‘पुन्हा दुखापती’ झाल्याच्या अफवांवर मोहम्मद शमीचा खुलासा, म्हणाला, “खोट्या….”
’11 षटकार, 9 चौकार’, न्यूझीलंडच्या दिग्गजाची वादळी शतकी खेळी, संघाचा दणदणीत विजय