पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील रोमांचक सामना मंगळवारी (11 ऑक्टोबर) हैदराबादमध्ये खेळला गेला. या सामन्यात दोन्ही संघांनी मोठी धावसंख्या केली आणि चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन देखील झाले. असे असले तरी, श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मथिशा पथिराना याने नकोसा विक्रम नावावर केला. पाकिस्तानने हा सामना 6 विकेट्सने जिंकला, पण पथिरान देखील श्रीलंकेसाठी चांगलाच महागात पडला.
मंगळवारी श्रीलंकन संघाने प्रथम फलंदाजी करताना तुफान फकटेबाजी केली. कुसल मेंडिस आणि सदिरा समरविक्रमा यांच्या शतकी खेळीमुळे श्रीलंकने 50 षटकात 9 बात 344 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानसाठी सलामीवीर उब्दुल्हा शफिक आणि मोहम्मद रिझवान यांनी शतकी खेळी केली. या दोघांच्या शतकांमुळे पाकिस्तानने हा सामना 48.2 षटकात 4 विकेट्सच्या नुकसानावर जिंकला. श्रीलंकेच्या मथिशा पथिराना (Matheesha Pathirana) याने 9 षटके गोलंदाजी केली आणि सर्वाधिक धावा खर्च केल्या.
पथिरानाच्या गोलंदाजीवर पाकिस्तानी फलंदाजांनी 8 चौकार आणि 1 षटकार मारला. मथिशाने एकूण 90 धावा खर्च केल्या. तत्पूर्वी विश्वचषकातील पहिला सामना श्रीलंकेने दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध खेळला होता. पथिरानाने या सामन्यात तब्बल 95 धावा खर्च केल्या होत्या. एकंदरीत पाहता विश्वचषकात तो श्रीलंकन संघासाठी चांगलाच महागात पडला आहे. वनडे क्रिकेटमध्ये सलग दोन डावांमध्ये 90 पेक्षा जास्त धावा खर्च करणारा पथिराना केवळ दुसरा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी अशी नकोशी कामगिरी आयर्लंडच्या केविन ओब्रायन () याच्या नावावर होती. 2015 विश्वचषकात ओब्रायनने दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांच्याविरुद्ध सलग दोन डावांमध्ये 90 पेक्षा जास्त धावा खर्च केल्या होत्या. (Matheesha Pathirana has become only the second bowler to scconcede ore more than 90 runs in two consecutive ODI World Cup matches.)
2023 विश्वचषकात मथिशा पथिराना याचे प्रदर्शन
1/95 विरुद्ध दक्षिण आफ्रिका
1/90 विरुद्ध पाकिस्तान
महत्वाच्या बातम्या –
भारत-पाकिस्तान सामन्यातून शुबमन करणार पुनरागमन? प्रशिक्षकांनी दिली अपडेट
INDvAFG: बुमराहने दाखवला झादरानला बाहेरचा रस्ता! ‘त्या’ सेलिब्रेशनची होतेय चर्चा