इंग्लंड विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यासाठी इंग्लंडने 14 जणांच्या संघाची घोषणा केली आहे.
त्यांनी इंग्लंड संघात जेम्स विन्सचा समावेश केला असून जॅमी पॉर्टरला वगळले आहे. विन्सचा दुखापतग्रस्त असणाऱ्या जॉनी बेअरस्टोला कव्हर म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे.
जॉनी बेअरस्टोला ट्रेंटब्रिजवर झालेल्या तिसऱ्या सामन्यादरम्यान बोटाला दुखापती झाली होती. त्यामुळे चौथ्या सामन्यासाठी तो जर फिट झाला नाही तर त्याच्या जागेवर जॉस बटलर यष्टीरक्षण करेल.
विन्स हा यावर्षीच्या कौंटी क्रिकेट मोसमात चांगल्या फॉर्ममध्ये आहे. तसेच तो इंग्लंडकडून आत्तापर्यंत 13 कसोटी सामने खेळला आहे. यात त्याने 3 शतकांसह 24.90 च्या सरासरीने 548 धावा केल्या आहेत.
तो इंग्लंडकडूून न्यूझीलंड विरुद्ध 30 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान झालेल्या कसोटी सामन्यात शेवटचा कसोटी खेळला होता.
इंग्लंडच्या संघात हा एकमेव बदल वगळता अन्य संघ कायम ठेवण्यात आला आहे.
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील चौथा सामना 30 आॅगस्टपासून साउथॅंप्टनमधील द रोज बॉल मैदानावर सुरु होणार आहे. या मालिकेत इंग्लंड 2-1 असा आघाडीवर आहे.
असा आहे चौथ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ-
जो रूट (कर्णधार), मोईन अली, जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो, स्टुअर्ट ब्रॉड, जोस बटलर, अॅलिस्टर कूक, सॅम करन, केटन जेनिंग्स, ओली पोप, बेन स्टोक्स, आदिल रशीद, जेम्स विन्स, ख्रिस वोक्स.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–दिग्गज भारतीय गोलंदाज झुलन गोस्वामीची टी२० क्रिकेटमधून निवृत्ती
–विराट कोहलीचा कसोटी क्रमवारीत पुन्हा एकदा डंका
–इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिका: पृथ्वी शॉ, हनुमा विहारीचा प्रथमच टीम इंडियामध्ये समावेश