जसप्रीत बुमराह मोठ्या काळानंतर शुक्रवारी (17 ऑगस्ट) मैदानात परतला. बुमराह आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारताचा कर्णधार आहे. मालिकेतील पहिल्याच सामन्यात त्याच्या नेतृत्वात भारताने यजमान संघाला 2 विकेट्सने मात दिली. पावसाच्या व्यत्ययामुळे सामन्याचा निकाल डकवर्थ लुईस नियमानच्या आधारे दिला गेला. सामना संपल्यानंतर जसप्रीत बुमराहने आपल्या पुनरागमनाविषयी खास प्रतिक्रिया दिली.
जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज असला, तरी मागच्या जवळपास 11 महिन्यांपासून तो एकही सामना खेळला नव्हता. त्याच्या पुनरागमनाची प्रतीक्षा चाहत्यांना मागच्या अनेक महिन्यांपासून होती. पण दुखापतीनंतर वेगवान गोलंदाजासाठी पुनरागमन वाटते तितके सोपे नक्कीच नव्हते. त्याने आयर्लंडविरुद्धच्या पहिल्याच टी-20 सामन्यात 4 षटकात 24 धावा खर्च करून 2 विकेट्स नावावर केल्या. या सामन्यात मिळालेल्या विजयानंतर भारतीय संघ तीन सामन्यांच्या या मालिकेत 0-1 अशा आघाडीवर आहे. बुमराहला आपल्या प्रदर्शनासाठी सामनावीर पुरस्कार मिळाला.
सामना संपल्यानंतर बुमराह म्हणाल्याप्रमाणे, संघातून बाहेर असताना त्याने काही गमावल्यासारखे वाटले नाही. कारण बेंगलोरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये तो नियमित सराव करत होता. बुमराह माध्यमांसमोर म्हणाला, “चांगला अनुभव होता. एनसीएमध्ये मी एनसीएमध्ये खूप सराव सत्र पार पाडले. असे अजिबात वाटलं नाही की, मी खुपकाही गमावलं आहे. यासाठी एनसीएच्या स्टाफला श्रेय दिले पाहिजे. त्यांनी मला नेहमीच चांगल्या मुडमध्ये ठेवले. पुनरागमनाच्या सामन्यात मी चिंतेत नाही, तर आनंदी आहे. खेळपट्टीवर सुरुवातील स्विंग मिळत होता. आम्हाला या स्विंगचा उपयोग करून घ्यायचा होता. नशिबाने आम्ही नाणेफेक जिंकली आणि सर्वकाही मनाप्रमाणे झाले. नक्कीच वातावरणाचा काही प्रमाणात फायदा मिळाला.”
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर नाणेफेक गमावल्यानंतर आयर्लंडला प्रथम फलंदाजी करावी लागली. निर्धारित 20 षटकांमध्ये आयर्लंडने 7 बाद 139 धावा केल्या. 140 धावांचे लक्ष्य मिळाल्यानंतर भारताने 6.5 षटकात 2 बाद 47 धावा केल्या होत्या. मात्र तितक्यात मैदानात पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे सामना पुन्हा सुरू होऊ शकला नाही आणि भारताला विजयी घोषित करण्यात आले. डकवर्थ लुईस नियमानुसार भारताने हा सामना 2 धावांनी जिंकला होता. (Jasprit Bumrah talks about his amazing comeback)
महत्वाच्या बातम्या –
BREAKING! रिंकू आणि प्रसिद्ध कृष्णाचे टी-20 पदार्पण, आयर्लंडविरुद्ध पहिल्या सामन्यात अशी आहे प्लेइंग इलेव्हन
लयच भारी रे! ‘कमबॅक मॅन’ बुमराहने पहिल्याच षटकात उडवल्या दांड्या, आयर्लंड अडचणीत