बंगळूरू। भारताने आज, 15 जूनला अफगाणिस्तान विरुद्ध पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्याच दिवशी एक डाव आणि 262 धावांनी विजय मिळवला आहे.
भारताचा नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेने या सामन्यात भारताचे नेतृत्व केले. त्यामुळे सामना संपल्यावर विजयाची ट्रॉफी अजिंक्य रहाणेने उचलली. ही ट्रॉफी स्विकारल्यानंतर कर्णधार रहाणेमध्ये असलेली खिलाडूवृत्ती दिसुन आली.
त्याने पहिलाच कसोटी सामना खेळणाऱ्या अफगाणिस्तानच्या संघाला भारतीय संघाबरोबर आणि विजेतेपदाच्या ट्रॉफीबरोबर फोटो काढण्यासाठी बोलावून घेतले. त्याच्या कृतीने त्याने सर्वांचीच मने जिंकली आहेत.
याचा व्हिडिओ बीसीसीआयने ट्विटरवर शेअर केला आहे.
What a brilliant gesture from #TeamIndia to ask @ACBofficials players to pose with them with the Trophy. This has been more than just another Test match #SpiritofCricket #TheHistoricFirst #INDvAFG @Paytm pic.twitter.com/TxyEGVBOU8
— BCCI (@BCCI) June 15, 2018
भारतीय संघ आता पुढच्या आठवड्यात आयरलँडच्या दौऱ्यासाठी रवाना होईल. या दौऱ्यात भारत 2 टी20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यानंतर ते इंग्लंड दौऱ्यावर जातील.
या कसोटी सामन्यात भारतीय संघाटचे नेतृत्व केलेल्या रहाणेची मात्र आयरलँडच्या दौऱ्यासाठी आणि इंग्लंड दौऱ्यात होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी भारतीय संघात निवड झालेली नाही.
महत्त्वाच्या बातम्या:
–दुसऱ्याच दिवशी पहिली कसोटी खेळणाऱ्या अफगाणिस्तानला भारताचा धोबीपछाड
–फुटबाॅलप्रेमापोटी क्रिकेटर रोहित शर्मा पत्नी रितीकासह थेट रशियाला
–तब्बल ५ नकोसे विक्रम; तेही पहिल्याच सामन्यात