भारतीय क्रिकेट संघाला ऑस्ट्रेलियात झालेल्या टी20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पराभूत व्हावे लागले होते. या पराभवानंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी प्रतिक्रिया देताना, भारतीय खेळाडूंना विदेशातील लीग न खेळण्याचा तोटा होत असल्याचे म्हटले होते. याच मुद्द्यावर अनेक दिग्गजांमध्ये मतभेद देखील दिसून आले. आता भारताचा माजी सलामीवीर व समालोचक आकाश चोप्रा यानेही आपली प्रतिक्रिया दिली आहे.
टी20 विश्वचषकात पराभव झाल्यानंतर राहुल यांनी पहिल्याच पत्रकार परिषदेत भारतीय खेळाडूंना विदेशात लीग खेळण्याचा अनुभव नसल्याचा मुद्दा उपस्थित केलेला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आपल्या खेळाडूंना खेळण्याची परवानगी देण्यात यावी याबाबत विचार करावा असे म्हटले. याबाबत अनेक माजी भारतीय खेळाडूंनी देखील त्याला पाठिंबा दिलेला.
भारतीय खेळाडूंच्या विदेशी खेळण्याबाबत बोलताना आकाश चोप्रा याने आपल्या यु ट्युब चॅनलवर बोलताना सांगितले,
“काही दिवसांपासून भारतीय खेळाडूंना विदेशी लीगमध्ये खेळवावे अशी चर्चा सुरू आहे. मात्र, बोर्डाशी करार असलेल्या ए प्लस व ए गटातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी देखील वेळ नाही. त्यामुळे ते विदेशातील लीग खेळणार कधी? तशीही, भारतीय खेळाडूंना याची गरज नाही. कारण, बाहेरच्या लीगपेक्षा जास्त पैसे त्यांना येथेच मिळतात.”
सध्या बीसीसीआय कोणत्याच भारतीय खेळाडूंना विदेशी टी20 लीग खेळण्याची परवानगी देत नाही. भारतीय खेळाडूंना परदेशात खेळायचे असल्यास त्यांना थेट निवृत्ती घ्यावी लागते. मागील दोन वर्षात अनेक युवा भारतीय खेळाडूंनी निवृत्ती घेत अमेरिकेचा रस्ता धरला आहे.
(Aakash Chopra On Indian Cricketers In Foreign T20 League)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
द्युती चंद अडकली विवाहबंधनात! आपल्या समलैंगिक साथीदाराशी बांधली सात जन्माची गाठ
भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची दुकानदाराला मारहाण, सीसीटीव्ही फुटेज होतेय व्हायरल