आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धा १७ सप्टेंबरपासून ओमान आणि यूएईमध्ये सुरू होणार आहे आणि खेळाडू त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीसह या स्पर्धेत पाऊल ठेवण्यास सज्ज झाले आहेत. टी-२० विश्वचषकासाठी भारताने यूएईच्या खेळपट्टीवरील फिरकीचे वर्चस्व आणि महत्त्व लक्षात घेता संघात ५ फिरकी गोलंदाजांना स्थान दिले आहे.
भारतीय संघात राहुल चहर, वरुण चक्रवर्ती आणि आर अश्विन सारख्या खेळाडूंसह एकूण पाच फिरकीपटूंचा समावेश आहे. भारताने या मोठ्या स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघ आणि तीन राखीव खेळाडूंची निवड केली आहे. त्यामुळे प्लेईंग इलेव्हन निवडताना मोठी समस्या प्रशिक्षक आणि कर्णधाराला सतावत राहील.
भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा म्हणाला की, जर विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्यास सर्वाधिक पात्र व्यक्ती असेल, तर तो अष्टपैलू रवींद्र जडेजा असेल. सीएसके संघासाठी जडेजा आयपीएल २०२१ च्या प्रारंभापासून उत्कृष्ट फॉर्ममध्ये खेळत आहे आणि खेळाच्या तिन्ही विभागांमध्ये त्याने त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे छाप पाडली आहे.
जडेजाने आयपीएल २०२१ मध्ये १० सामन्यांत १७९ धावा केल्या आहेत. त्याने हर्षल पटेलच्या एका षटकात ३७ धावा फटकावल्या होत्या, हे चाहत्यांना सहज विसरता येणार नाही. आशिष नेहरा म्हणाला की, भारतीय संघात त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये जागा मिळेल का नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरेल, परंतु त्याचे नाव मुख्य प्रशिक्षक आणि विराट कोहलीच्या मनात नक्कीच राहील.
आशिष नेहरा पुढे म्हणाला, ‘तो गोलंदाजीत प्रभावी आहे. त्याने केकेआर विरुद्ध एक महत्त्वपूर्ण विकेट घेतली आणि चार षटकांत फक्त २१ धावा दिल्या. ज्या प्रकारच्या गोलंदाजीसाठी ओळखले जाते, त्याचे त्याने उत्कृष्ट प्रदर्शन केले. त्याच्या फलंदाजीच्या बाबत बोलायचे झाले तर, त्याने गेल्या २ वर्षांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. आपण एमएस धोनी, आंद्रे रसेल आणि कायरन पोलार्डबद्दल बोलतो, पण आज रवींद्र जडेजाने तेच काम करत आहे.
तो पुढे म्हणाला, ‘भारतीय संघामध्ये रवींद्र जडेजाचा आधीच समावेश होतो की तिसरा फिरकीपटू म्हणून हे पाहणे मनोरंजक असेल. मी म्हणेन की आपण आतापर्यंत जी परिस्थिती पाहिली आहे, जडेजा हे प्रशिक्षक शास्त्री, कर्णधार कोहली आणि मार्गदर्शक धोनी यांच्या मनात पहिले नाव असेल जेव्हा प्लेइंग इलेव्हनचा निर्णय घेतला जाईल.’
रवींद्र जडेजा चेन्नई सुपर किंग्जच्या शेवटच्या सामन्यातही चमकदार कामगिरी केली होती, त्याने आठ चेंडूत २२ धावा केल्या होत्या आणि एक विकेट घेत आपल्या संघाला विजयाकडे नेले.
महत्त्वाच्या बातम्या –
कुलदीप यादववर झाली मोठी शस्त्रक्रिया; भावनिक पोस्ट करत म्हणाला, ‘आता मी लवकर…’
एकही सामना न खेळता ‘ज्युनिअर तेंडुलकर’ आयपीएलमधून आऊट; या गोलंदाजाला मिळाली जागा
भारतीय महिला ऐतिहासिक ‘पिंक बॉल टेस्ट’साठी सज्ज, दीड दशकानंतर खेळणार ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी