भारतात यावर्षी वनडे विश्वचषक खेळवला जाणार आहे. बीसीसीआय यासाठी पूर्ण तयारी करत आहे. बुधवारी (13 सप्टेंबर) वनडे विश्वचषकासाठी अफगाणिस्तानचा 15 सदस्यीय संघ घोषित केला गेला. आयपीएलमध्ये विराट कोहलीसोबत वाद घालणाऱ्या नवीन उल हक याला या संघात स्थान दिले गेले आहे.
हशमतुल्ला शाहिदी याच्या नेतृत्वात आशिया चषक खेळणाऱ्या अफगाणिस्तान संघात चार बदल करून वनडे विश्वचषकासाठी संघ घोषित केला गेला आहे. नवीन उल हक () याला या संघात निवडल्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये नवीन आणि विराट कोहली () यांच्यातील वाद चांगलाच चर्चेत राहिला होता. अशात वनडे विश्वचषकात हा वाद पुन्हा एकदा पाहायला मिळू शकतो.
https://x.com/ACBofficials/status/1701911363436913149?s=20
(Afghanistan squad for ICC Cricket World Cup 2023)
एकदिवसीय विश्वचषक २०२३ साठी अफगाणिस्तान संघ –
हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम झद्रान, रियाझ हसन, रहमत शाह, नजीबुल्ला झद्रान, मोहम्मद नबी, इकराम अलीखिल, अजमतुल्ला उमरझाई, राशिद खान, रहमान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, नवीन-उल-हक, फजलहक फारुक
राखीव खेळाडू – गुलबदिन नायब, शराफुद्दीन अश्रफ, फरीद अहमद मलिक.
महत्वाच्या बातम्या –
भारत-बांगलादेश सामन्यातून दिग्गजाने घेतली माघार, वैयक्तिक कारण सोशल मीडियावर व्हायरल
प्रेक्षकांच्या हाणामारीने भारत-श्रीलंका सामन्याला गालबोट! स्टेडिअममध्येच भिडले फॅन्स; व्हिडिओ तुफान व्हायरल