भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक रिषभ पंत हा सध्या त्याच्या कारकिर्दीतील अतिशय खराब काळातून जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर तो सातत्याने अपयशी होताना दिसतोय. त्यामुळेच त्याच्यावर माजी क्रिकेटपटू तसेच चाहते देखील टीका करतायेत. मात्र, आपल्यावर होत असलेल्या या टीकेच्या पार्श्वभूमीवर पंत प्रथमच बोलला आहे.
रिषभ हा मागील बऱ्याच काळापासून सातत्याने अपयशी ठरत आहे. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेनंतर त्याला एकही मोठी खेळी करता आली नाही. टी20 विश्वचषकातही दोन सामन्यात त्याला आपला प्रभाव पाडता आला नाही. तर, या दौऱ्यावरील टी20 व वनडे अशा दोन्ही मालिकांमध्ये त्याची बॅट थंडावलेलीच आहे. हाच धागा पकडून त्याला विचारले गेले की, तुला कसोटी क्रिकेट व मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील तुझ्या कामगिरीत तफावत दिसते का? त्यावर पंत उत्तरला,
“खरं तर मी आकडेवारीवर विश्वास ठेवत नाही. माझी वनडे व टी20 क्रिकेटमधील कामगिरी खराब नाही. मी कसोटी इतकाच या क्रिकेटच्या प्रकारातही यशस्वी आहे. सध्या मी केवळ 24 वर्षांचा आहे. त्यामुळे तुलना करायची झाल्यास मी 30-32 वर्षांचा झाल्यावर ही तुलना करण्यात यावी.”
पंतला आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखले जाते. मात्र, यावर्षी वनडे व टी20 क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी कमालीची घसरलेली आहे. पंत हा अपयशी ठरत असल्याने त्याला संघातून बाहेर करण्याची मागणी वारंवार होतेय. पंतमुळे चांगली कामगिरी केल्यानंतर ही संजू सॅमसन याला बाकावर बसावे लागत असल्याचे दिसून येते. सततच्या या खराब कामगिरीमुळे पंत अनेक माजी क्रिकेटपटूंच्या निशाण्यावर देखील आला आहे.
(Am Just 24 Dont Compare Me Rishabh Pant Said)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऋतुराजच्या मनाचा मोठेपणा! म्हणाला, “माझे द्विशतक संपूर्ण महाराष्ट्राला अर्पण करतो”
‘बास करा माझी इंग्रजी इथेच संपली’, पाकिस्तानी खेळाडूकडून पत्रकार परिषदेत स्पष्ट उत्तर