वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत पाकिस्तान संघ अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. या विश्वचषकात त्यांना उपांत्य फेरीत प्रवेश करण्यात अपयश आले. त्यानंतर पाकिस्तान संघावर टीका होत आहे. असे असतानाच आता पाकिस्तानचे माजी वेगवान गोलंदाज आकिब जावेद यांनी एक धक्कादायक खुलासा केला.
पाकिस्तान संघाची या विश्वचषकातील खराब कामगिरी पाहता त्यांच्यावर अनेक माजी खेळाडूंनी टीका केली. मात्र, मायदेशी परतल्यानंतर या खेळाडूंचे चांगल्या प्रकारे स्वागत केले गेले. त्याच मुद्द्याला धरून जावेद यांनी एका कार्यक्रमात जुनी आठवण सांगितली. ते म्हणाले,
“आम्ही 1996 विश्वचषकात उपांत्य फेरीपर्यंत पोहोचू शकलो नव्हतो. त्यावेळीचे चाहते आमच्यावर चांगले संतापले होते. आम्ही पाकिस्तानमध्ये गेल्यानंतर आमच्यावर चक्क टोमॅटो व अंडी फेकली गेलेली. आम्हाला वाचवण्यासाठी त्यावेळी सुरक्षारक्षक देखील नव्हते. घरी कसे पोहोचायचे हे देखील आम्हाला समजले नाही. आमच्या घरावर देखील दगडफेक करण्यात आलेली.”
पाकिस्तान संघ 2023 च्या विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत पोहोचू शकला नाही. संघाने चार सामने जिंकले तर पाच सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले. उपांत्य फेरी गाठण्यासाठी पाकिस्तानला त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात इंग्लंडला मोठ्या फरकाने पराभूत करणे आवश्यक होते. परंतु ते तसे करू शकले नाहीत. विश्वचषकात पाकिस्तान संघाला पाच सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले होते. यापूर्वी एकाही विश्वचषकात ते पाच सामने हरले नव्हते.
(Aqib Javed Speaks About 1996 ODI World Cup How Pakistani Peoples React)
हेही वाचा-
IND vs NZ सेमीफायनलपूर्वी आली विलियम्सनची प्रतिक्रिया; म्हणतो, ‘ही तर फक्त एक दिवसाची…’
‘मान्य करावंच लागेल, सेमीफायनलमध्ये दबाव…’, कोच द्रविडचे न्यूझीलंडशी भिडण्यापूर्वी मोठे विधान