---Advertisement---

”स्टोक्समध्ये ती बात राहिली नाही”; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने उडविली खिल्ली

On: मंगळवार, डिसेंबर 28, 2021 1:12 AM
ben-stokes
---Advertisement---

इंग्लंड संघाचा दिग्गज अष्टपैलू बेन स्टोक्स (ben stokes) याने मोठ्या विश्रांतीनंतर ऍशेस मालिकेतून संघात पुनरागमन केले. परंतु पुनरागमन केल्यापासून त्याला एकदाही अपेक्षित प्रदर्शन करता आले नाही. इंग्लंडने ऍशेस मालिकेतील (ashes series) पहिले दोन सामने गमावले आहेत आणि तिसऱ्या सामन्यात देखील संघ अडचणीत आला आहे. इंग्लंडच्या आणि स्टोक्सच्या या खराब प्रदर्शनानंतर ऑस्ट्रेलिया संघाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंग (ricky ponting) याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. पॉंटिंगने इंग्लंडचा कर्णधार जो रूट, स्टोक्स आणि जोस बटलर यांच्यावर निशाणा साधला आहे.

माध्यमांशी बोलताना पॉंटिंग म्हणाला की, “तो अति बचावात्मक खेळत आहे. तो स्टोक्स दिसत नाहीये, ज्याच्या आक्रमकतेला विरोधी संघ घाबरायचे. याचे कारण देखीस समजत आहे, एक म्हणजे परिस्थिती फलंदाजीसाठी परिस्थिती अनुकूल नाहीय आणि दुसरे म्हणजे त्याचा सामना अप्रतिम गोलंदाजांसोबत होत आहे.”

“पण मला वाटते की, तुम्ही हातावर हात धरून बसू शकत नाही. अशात तर हे गोलंदाज दबाव बनवतील. जेव्हा मी खेळायचो, तेव्हा संघात आम्ही नेहमी म्हणायचो की, जेवढा चांगला गोलंदाज असेल, तेवढीच जोखिम फलंदाजाला देखील घ्यावी लागेल. कारण, कोणताच खराब चेंडू मिळणार नाहीये.” असे पॉंटिंग पुढे म्हणाला.

पॉंटिंगच्या मते इंग्लंडच्या फलंदाजांच्या खराब प्रदर्शनामुळे स्टोक्सवरचा दबाव वाढला आहे. तसेच इंग्लंड संघाला संकटातून बाहेर काढण्याच्या त्याची पारंपारिक सवय स्टोक्सला सोडावी लागेल, असेही पॉटिंगला वाटते. तो पुढे म्हणाला की, “पाचव्या क्रमांकावर उतरून त्याला माहिती आहे की, त्याने धावा करणे किती गरजेचे आहे. त्यामुळे तो अतिरिक्त प्रयत्न करत आहे. परंतु, त्याच्यापेक्षा बचावात्मक शैली असलेल्या फलंदाजाला त्याच्या आधी फलंदाजीसाठी पाठवणे, आकलनापलीकडचे आहे. मला वाटते की, जो रूटनंतर स्टोक्स तंत्राच्या बाबतीत दुसरा सर्वश्रेष्ठ खेळाडू आहे.”

दरम्यान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात देखील ऑस्ट्रेलियाने आघाडी घेतली आहे आणि संघ भक्कम स्थितीत आहे. तिसऱ्या सामन्यात दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलिया संघ ५१ धावांनी आघाडीवर आहे. तत्पूर्वी, इंग्लंडने पहिल्या डावात १८५ धावा केल्या होत्या, त्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या डावात २६७ धावा करून आघाडी घेतली होती.

महत्वाच्या बातम्या –

ज्या डीआरएसने वाचवले, त्याबद्दलच वाईट बोलला हॅरिस; आवाज स्टंप माईकमध्ये कैद झाल्याने वाढलं टेंशन

चौथ्या अरुण साने मेमोरियल हौशी टेनिस लीग स्पर्धेत टेनिसनट्स, महाराष्ट्र मंडळ, डेक्कन गोल्डन बॉईज संघांचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

SAvsIND, 1st Test, Live: सेंच्युरीयन कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पावसाचा खेळ; एकही चेंडू न टाकता खेळ रद्द

व्हिडिओ पाहा –

बॉक्सिंग डेचा अर्थ, त्याचा इतिहास आणि बरचं काही... | What is Boxing Day Test? History of Boxing Day

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---