भारतीय क्रिकेट नियमक मंडळाने(बीसीसीआय) भारत अ संघाच्या 5 गोलंदाजांना एशिया कपमध्ये वरिष्ठ भारतीय संघाच्या मदतीसाठी संयुक्त अरब अमिरातीमध्ये पाठवणार आहे.एशिया कपची स्पर्धा शनिवारी (15 सप्टेंबर) सुरु होणार झाली आहे.
या पाच गोलंदाजांमध्ये मध्यप्रदेशचा आवेश खान, कर्नाटकचा एम प्रसिद्ध कृष्णा आणि पंजाबचा सिद्धार्थ कौल हे वेगवान गोलंदाज, तर लेग स्पिनर शाहबाज नदीम आणि मयंक मार्कंडे यांचा समावेश आहे.
पुढचे तीन दिवस हे पाच गोलंदाज भारतीय संघाला नेटमध्ये सराव देणार आहेत. आवेश व्यतिरिक्त अन्य गोलंदाज भारत ‘अ’, ‘ब’, आॅस्ट्रेलिया अ आणि दक्षिण आफ्रिका अ या संघांमध्ये पार पडलेल्या चौरंगी मालिकेत खेळले आहेत.
तसेच कौलचा भारताच्या नुकत्याच संपलेल्या इंग्लंड दौऱ्यातील मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी संघात समावेश होता.
हे पाचही गोलंदाज तीन दिवसांनंतर परत भारतात परण्याची शक्यता आहे. कारण 19 सप्टेंबरपासून विजय हजारे ट्रॉफीची स्पर्धा सुरु होत आहे. त्यामुळे ते भारतीय संघाला सराव देऊन पुन्हा त्यांच्या राज्याच्या संघांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी परतील.
याबद्दल बीसीसीआयच्या वरिष्ठांनी माहिती दिली की “सगळीकडे तूम्हाला नेटमध्ये गोलंदाजी करण्यासाठी गुणवत्तापूर्ण गोलंदाज भेटतात असे नाही. त्यामुळे ही वरिष्ठ संघापुढे सराव सत्रात समस्या उभ्या राहतात.”
“सगल दोन सामन्यांसाठी तूम्ही भूवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराहकडून नेटमध्ये गोलंदाजी करत फलंदाजांना सराव देण्याची अपेक्षा करु शकत नाही. त्याचबरोबर अॅकॅडमीतील युवा गोलंदाज गुणवत्तापूर्ण सराव देऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही आमचे गोलंदाजांची पुढच्या फळीला पाठवले आहे.”
तसेच ते पुढे म्हणाले, “या प्रक्रियेमुळे संघाला परस्पर फायदेशीर ठरु शकते. वरिष्ठ संघातील फलंदाजांचा उत्तम सराव मिळेल आणि मयंक मार्कंडे सारख्या गोलंदाजांना भारतीय नेटमध्ये गोलंदाजी करताना भरपूर शिकायलाही मिळेल.”
भारतीय संघासाठी नेटमध्ये फलंदाजांना सराव देण्यासाठी ज्यादाचा गोलंदाजाला पाठवण्याची पद्धत दक्षिण आफ्रिका दौऱ्यापासून सुरु झाली आहे. त्यावेळी आवेश खान आणि बासिल थंपीला दक्षिण आफ्रिकेत नेटमध्ये गोलंदाजी करण्यासाठी पाठवले होते.
याबरोबरच बीसीसीआयने श्रीलंकेमधून नुवान सेनेविरात्ने या नावाच्या लेफ्ट-आर्म थ्रोडाउन तज्ञांना नेमले आहे. त्यांची नेमणुक ही विशेषत: वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीरच्या गोलंदाजीचा आणि वेगवान गोलंदाजीचा सामना करता यावा या हेतूने करण्यात आली आहे.
शुक्रवारी(14 सप्टेंबर) भारतीय संघातील 10 क्रिकेटपटूंनी पहिल्या सराव सत्रात भाग घेतला होता. तसेच इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिकेत भारतीय संघाचा भाग असलेले आणि एशिया कपसाठी भारतीय संघात निवड झालेले अन्य क्रिकेटपटू रविवार पर्यंत दुबईला येतील.
भारताचा पहिला सामना मंगळवारी 18 सप्टेंबरला हाँगकाँगविरुद्ध आणि दुसरा सामना 19 सप्टेंबरला पाकिस्तान विरुद्ध होणार आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–Video: शोएब मलिक आणि एमएस धोनी यांच्या सरावादरम्यान रंगल्या गप्पा
–इंग्लंडच्या मोईन अलीचे ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूवर गंभीर आरोप
–पाकिस्तानच्या माजी खेळाडूंना भारताला नमवण्याचा विश्वास