आशियाई क्रिकेट परिषददेने (ACC) अंडर-19 आशिया चषकाचे (U-19 Asia Cup) वेळापत्रक जाहीर केले आहे. ही स्पर्धा (29 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर) दरम्यान युएईमध्ये आयोजित केली जाणार आहे. पण आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी (Champions Trophy) क्रिकेट चाहत्यांना या स्पर्धेत भारत विरूद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) संघात सामना पाहायला मिळणार आहे. भारत-पाकिस्तान संघ (30 नोव्हेंबर) रोजी आमने-सामने असणार आहेत.
यंदाच्या अंडर-19 आशिया चषक स्पर्धेत 8 संघ सहभागी होत असून त्यामध्ये भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, जपान आणि युएई या संघांचा समावेश आहे. या 8 संघांची 2 गटात विभागणी करण्यात आली असून एका गटात 4 संघ आहेत. पाकिस्तान, यूएई, जपान आणि भारत या संघांना अ गटात ठेवण्यात आले आहे, तर बांगलादेश, अफगाणिस्तान, नेपाळ आणि श्रीलंका या संघांना ब गटात ठेवण्यात आले आहे.
यंदाच्या अंडर-19 आशिया चषकातील पहिला सामना गतविजेता संघ बांगलादेश विरूद्ध अफगाणिस्तान (Bangladesh vs Afghanistan) संघात होणार आहे, तर या स्पर्धेचा फायनल सामना (8 डिसेंबर) रोजी होणार आहे. या स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात भारत-पाकिस्तान भिडणार आहेत. (30 नोव्हेंबर) रोजी दोन्ही संघातील ही लढत पाहायला मिळणार आहे.
The generation next, is ready to battle it out at the #MensU19AsiaCup2024 starting November 29 🗓️. The action-packed tournament will be contested across Dubai and Sharjah with the finals being contested on December 8.🏆#ACC pic.twitter.com/lkaoPWSNFR
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) November 8, 2024
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs SA; शानदार विजयानंतर भारतीय कर्णधार म्हणाला, “आम्हाला कोणत्याही…”
IND vs SA; शानदार शतकानंतर संजू सॅमसनने मोठे वक्तव्य करत जिंकली चाहत्यांची मनं!
भारताच्या कसोटी संघात पुजारासाठी स्थान आहे, माजी खेळाडूने मोठे वक्तव्य!