इंडोनेशियात सुरू असलेल्या एशियन गेम्समध्ये भारतीय खेळाडूंनी वुशू या प्रकारात चार कांस्यपदक जिंकले आहेत. यामध्ये नायोरेम रोशिबीना देवी, संतोष कुमार, नरेंदर ग्रेवाल आणि सुर्य प्रताप सिंग यांनी आपापल्या गटात हे कांस्यपदक जिंकले आहे.
या प्रकारात भारत २००६, २०१० आणि २०१४च्या एशियन गेम्समध्ये खेळला आहे. २०१४ला त्यांनी दोन कांस्यपदके जिंकली होती. यामध्ये ग्रेवालने ६० किलो वजनी गटात एक कांस्यपदक पटकावले होते. तर २००६मध्ये एक कांस्य आणि २०१०च्या एशियन गेम्समध्ये एक रौप्य व एक कांस्य पदक जिंकले होते.
६० किलो वजनी गटात खेळताना १७ वर्षीय रोशिबीनाला उपांत्य सामन्यात चीनच्या काई यिंगयिंगकडून ०-१ने पराभूत व्हावे लागले. तर २६ वर्षीय संतोष ५६ किलो वजनी गटात व्हिएतनामच्या ट्रुओंग बुईकडून ०-२असा पराभूत झाला.
ग्रेवाल आणि सुर्य प्रताप यांनीही उपांत्य सामन्यात निराशा केली. ६५ किलो वजनी गटात खेळताना ग्रेवालला उजबेकीस्तानच्या अकमल राखीमोवकडून तर ६० किलो वजनी गटात सुर्यप्रतापला इराणच्या इरफान अहंगेरीयनकडून ०-२ने पराभूत व्हावे लागले. यावेळी सुर्य प्रतापला दुखापत झाली होती.
नक्की वुशू म्हणजे काय?
चायनीज कुंग फू या क्रिडा प्रकाराला वुशू असे म्हणतात. यामध्ये बॉक्सिंग आणि मार्शल आर्ट या दोन खेळांचा समावेश असतो. बॉक्सिंग प्रमाणेच यामध्येही टचपॉइंटचे गुण दिले जातात.
तसेच याचे प्रशिक्षण मार्शल आर्ट सारखेच असते. त्यामध्ये तुम्हाला आत्मबचाव आणि विविध कठीण वस्तू तोडण्याचे प्रशिक्षण दिले जाते. परंतु कोणत्याही मुख्य स्पर्धेच्या वेळी त्या कठीण वस्तू तोडण्याचा वापर यामध्ये केला जात नाही.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–एशियन गेम्स: १५ वर्षीय विहानला दुहेरी ट्रॅपमध्ये रौप्यपदक
–दिग्गज भारतीय गोलंदाज झुलन गोस्वामीची टी२० क्रिकेटमधून निवृत्ती