पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याला मंगळवारी (12 सप्टेंबर) आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार घोषित झाला. ऑगस्ट महिन्यात पाकिस्तानच्या या दिग्गज फलंदाजाने संघासाठी महत्वपूर्ण धावांचे योगदान दिले होते, ज्यासाठी हा पुस्कार त्याला मिळाली. दुसरीकडे महिला क्रिकेटमध्ये हा पुरस्कार आयर्लंडचा वेगवान गोलंदाज आर्लीन केली हिला मिळाला.
बाबर आझम (Babar Azam) सध्या आशिया चषकात पाकिस्तानचे नेतृत्व करत आहे. सोमवारी (11 सप्टेंबर) पाकिस्तानला भारताविरुद्ध 228 धावांनी मोठा पराभव स्वीकारावा लागला. मात्र, संपूर्ण स्पर्धेत पाकिस्तान संघाचे प्रदर्शन अप्रतिम राहिले आहे. मागच्या महिन्यात म्हणजेच ऑगस्टमध्ये बाबरने अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेत दोन अर्धशतके केली होती, तर नेपाळविरुद्ध 151 धावांची महत्वपूर्ण खेळीही केली होती. या प्रदर्शणाच्या जोरावर बाबरने आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार नावावर केला. या पुरस्कारासाठी वेस्ट इंडीज निकोलस पुरन आणि पाकिस्तानचा शादाब खान हे दोघेही स्पर्धेत होते. पण बाबरने या दोघांना पछाडले. दरम्यान, ही तिसरी वेळ आहे, जेव्हा बाबर आझम प्लेअर ऑफ द मंथ ठरला आहे.
महिला क्रिकेटमध्ये प्लेअर ऑफ द मंथसाठी आर्लीन केली (Arlene Kelly) हिच्यासह मलेशियाची अष्टपैलू आईन्ना हमीझा आणि नेदरलँडची युवा खेळाडू आयरिस झविलिंग या स्पर्धेत होत्या. पण आर्लीन केली हिने या दोघांना मात देत ऑगस्ट महिन्यातील महिला आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार जिंकला. आर्लीनने ऑगस्ट महिन्यात एकूण तीन सामने खेळले. यादरम्यान तिने अनुक्रमे 5, 3 आणि 2 अशा विकेट्श घेतल्या आणि हा पुरस्कार देखील नावावर केला. नेदरलँड महिला संघासोबत ही मालिका खेळली गेली होती. (Babar Azam became the ICC Player of the Month for the third time)
महत्वाच्या बातम्या –
INDvSL: वेललागेने पाडले टीम इंडियाच्या डावाला खिंडार! रोहित-विराटसह गिलही तंबूत
सुपर फोरच्या चौथ्या सामन्यात Team India ‘टॉस का बॉस’, श्रीलंकेलाही देणार का धोबीपछाड?