टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला शुक्रवारी (6 ऑगस्ट) एक मोठा झटका लागला. 65 किलो वजनी गटातील कुस्तीपटू बजरंग पूनिया उपांत्य फेरीत पराभूत झाला. बजरंगचा सामना अजरबैजानच्या हाजी अलियेव्हसोबत झाली. बजरंग सामन्याच्या सुरवातीला धीम्या गतीने खेळत होता, नंतर तो लयीत येण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याचा विरोधक खूप चपळ होता. त्यामुळे बजरंगला या सामन्यात 5-12 अशा फरकाने हार पत्करावी लागली.
बजरंगने हा सामना गमावल्यामुळे आता त्याच्या सुवर्ण किंवा रौप्य पदकाच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. पण असे असले तरी त्याला कांस्य पदक जिंकण्याची संधी आहे. याआधी कुस्तीमध्ये रवी कुमार दाहियाने रौप्यपदक जिंकले आहे. असे असले तरी भारताला विनेश फोगट आणि बजरंग पुनियाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. या दोघांनाही सुवर्णपदकाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र, विनेश फोगट उपांत्यपूर्व फेरीच्या पुढे जाऊ शकली नाही आणि आता बजरंग पुनिया उपांत्य फेरीत पराभूत झाला.
बजरंगच्या उपांत्य फेरीतील पराजयानंतर त्याचे वडील बलवान सिंग जराही विचलित न होता म्हणाले की, “हार-जीत हा जीवनाचा भाग आहे. तो नक्कीच कांस्यपदक घेऊन येईल.”
ऑलिंपिकमध्ये बजरंगच्या खेळाला शुक्रवारीच सुरुवात झाली होती. त्याचे संपूर्ण कुटुंब टिव्हीवर डोळे लावून बसले होते. घरामध्ये इतर लोकांची गर्दीही जमा झाली होती, ज्यामध्ये काही पत्रकारही होते. बजरंगने उपांत्यपूर्व फेरीत इराणचा कुस्तीपटू मुर्तेजा घियासीला पराभूत केले होते. मुर्तेजा घियासी हा एशियाई स्पर्धेत कांस्यपदक विजेता आहे.
बजरंग उपांत्यपूर्व फेरीत पोहचल्यावर त्याचे वडील खूप आनंदी होते. त्यावेळी ते म्हणाले होते, “आम्ही देवाजवळ प्रार्थना करतो की तो सुवर्ण पदक घेऊन येईल”. त्याची आई म्हणली, “बजरंग देशासाठी पदक नक्की घेऊन येईल आणि परिवार बजरंगच्या कामगिरीवर आनंदी आहे, कारण त्याने देशासाठी अनेक पदके जिंकली आहेत.
बजरंग उपांत्य फेरीत ज्या अजरबैजानच्या हाजी अलियेव्हकडून पराभूत झाला, तो रिओ 2016 मध्ये सुवर्णपदक विजेता आहे. त्याव्यतिरिक्त तो तीन वेळा विश्वविजेता आहे. बजरंग हा सामना हरला असला. तरी त्याने ऑलिम्पिकच्या अगोदर हाजीला पराभूत केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
Video: पंतने सलग २ चेंडूत मारले चौकार-षटकार, पण त्यापुढच्याच चेंडूवर झाला ‘असा’ बाद
मोहम्मद सिराजने चेंडू चमकवण्यासाठी केले ‘असे’ कृत्य; व्हिडिओ होतोय व्हायरल