इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका सध्या सुरू आहे. शनिवारी (23 सप्टेंबर) या मालिकेतील दुसरा सामना नॉटिंघममध्ये खेळला जात आहे. पाहुण्या आयर्लंडने नाणेफेक जिंकली असून त्यांचा संघ प्रथम गोलंदाजी करत आहे. इंग्लंडसाठी फलंदाजी अष्टपैलू विल जॅक्स याने या सामन्यात अप्रतिम खेळी केली. पण अवघ्या काही धावा कमी पडल्यामुळे त्याला आपले शतक करता आले नाही.
विल जॅक्स याने मायदेशात आयर्लंडविरुद्धच्या या सामन्यात शनिवारी अप्रतिम खेळी केली. नाणेफेक गमावल्यानंतर इंग्लंडला प्रथम फलंदाजी करावी लागली. फिल साल्ट आणि विल जॅक्स इंग्लंडसाठी डावाची सुरुवात करताना दिसले. फिल साल्टने वैयक्तिक 28 धावाकरून विकेट गमावली, पण जॅक्स मात्र खेळपट्टीवर टिकून राहिला. अवघ्या 6 धावा कमी पडल्यामुळे जॅक्सचे शतक होऊ शकले नाही. जर त्याने या सहा धावा केल्या असत्या, तर हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याचे पहिलेच शतक ठरले असते. जॅक्सने या सामन्यात 88 चेंडूत 7 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 94 धावांची खेळी केली. (BAN vs ENG Will Jacks misses out on a maiden international century)
इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यातील दुसऱ्या वनडेसाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
आयर्लंड – पॉल स्टर्लिंग (कर्णधार), अँडी बालबिर्नी, कर्टिस कॅम्फर, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर (wk), जॉर्ज डॉकरेल, अँडी मॅकब्राईन, मार्क अडायर, बॅरी मॅककार्थी, क्रेग यंग, जोश लिटल.
इंग्लंड – फिल सॉल्ट, विल जॅक्स, झॅक क्रॉली (कॅप्टन), बेन डकेट, सॅम हेन, जेमी स्मिथ (विकेटकीपर), ब्रायडन कार्स, रेहान अहमद, टॉम हार्टले, मॅट पॉट्स, जॉर्ज स्क्रिमशॉ.
महत्वाच्या बातम्या –
खेळाडू वृत्ती! बांगलादेश-न्यूझीलंड सामन्यात फॅमिली वाली फिलिंग, लिटन दासचा धाडसी निर्णय
न भूतो…! विश्वचषक स्पर्धांमध्ये खणकलंय शाकिबचं नाणं, ‘हा’ भीमपराक्रम करणारा बांगलादेशचा एकमेव धुरंधर