बुधवारी (७ जुलै) भारताचा सर्वकालीन महान कर्णधार एमएस धोनीसोबत युवा फलंदाज देवदत्त पडिक्कलचा वाढदिवस आहे. पडिक्कलचा जन्म ७ जुलै २००० रोजी केरळमधील एडप्पल शहरात झाला. मात्र, तो कर्नाटककडून घरगुती क्रिकेट खेळतो. पडिक्कल सध्या भारतीय संघासह श्रीलंका दौर्यावर आहे. राष्ट्रीय संघासोबतचा हा त्याचा पहिलाच दौरा असून येथे दोन्ही संघांमध्ये ३ वनडे आणि तीन टी२० सामन्यांना १३ जुलैपासून सुरूवात होईल.
बीसीसीआयने दिल्या शुभेच्छा
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) देखील पडिक्कल याला ट्विटरवरून २१ व्या वाढदिवसाबद्दल शुभेच्छा दिल्या. बोर्डाने ३० सेकंदाचा एक व्हिडिओ सामायिक केला आहे ज्यामध्ये पडिककल नेटमध्ये फलंदाजी करताना दिसतोय. या व्हिडिओला कॅप्शन देताना बीसीसीआयने लिहिले आहे की, ‘बर्थडे बॉय, या ३० सेकंदाच्या व्हिडिओमध्ये चेंडूला उत्कृष्टरित्या टाईम करत आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देवदत्त पडिक्कल’
🔉 SOUND ON!
3⃣0⃣ seconds of the birthday boy timing the ball to perfection in the nets 😍 👌
Happy birthday, @devdpd07! 👏🎂#TeamIndia #SLvIND pic.twitter.com/dTh0E6bffu
— BCCI (@BCCI) July 7, 2021
भारतीय संघात झाला आहे समावेश
विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय कसोटी संघ इंग्लंड दौर्यावर आहे. त्यामुळे, शिखर धवनच्या नेतृत्वात युवा खेळाडूंचा भरणा असलेला भारताचा संघ श्रीलंकेत मर्यादित षटकांच्या मालिका खेळेल. या संघात अनेक युवा खेळाडूंसह देवदत्त पडिक्कलचा देखील समावेश आहे. या दौर्यावर तो वनडे आणि टी२० मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण करू शकतो.
सध्या २१ वर्षीय पडिक्कल उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. श्रीलंका दौर्यावरील पहिल्या इंट्रा-स्कॉड मॅचमध्ये त्याने पृथ्वी शॉसोबत ६० धावांची भागीदारी केली. अशा परिस्थितीत शिखर धवनसह तो पहिल्या सामन्यात सलामीवीर म्हणून उतरू शकतो.
जबरदस्त फॉर्ममध्ये आहे पडिक्कल
गेल्या काही महिन्यांपासून पडिक्कल उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. तो विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोरसाठी आयपीएलमध्ये सलामी देतो. आयपीएल २०२१ पुढे ढकलण्यापूर्वी या फलंदाजाने ६ सामन्यात १९५ धावा केल्या होत्या. यातही त्याने राजस्थान रॉयल्सविरुद्ध नाबाद १०१ धावांची खेळी केली होती. आयपीएलमधील हे त्याचे पहिले शतक होते. पडिक्कलने २०२० मध्येच त्याने आयपीएल पदार्पण केले होते. त्याने आरसीबीकडून आतापर्यंत २१ सामन्यात ६६८ धावा केल्या असून, यात एक शतक आणि पाच अर्धशतके त्याच्या नावावर आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
श्रीलंका-भारत मालिकेआधी ‘हा’ दिग्गज घेऊ शकतो निवृत्ती
धावांचा रतीब घालणारा रनमशीन कोहली ‘या’ विक्रमात आहे इतिहासील अव्वल फलंदाज, वाचा
दिलीप कुमार यांनी बीसीसीआयकडे केली होती ‘या’ खेळाडूची शिफारस, पुढे त्याने भारताला बनवले विश्वविजेता